अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली ताबडतोड कमाई


बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के ठेवणे आणि राज्य करणे कोणत्याही कलाकारासाठी खूप मोठी उपलब्धी असते. अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये आपले नाव सुपरस्टार म्हणून घेतले जावे यासारखे दुसरे सौभाग्य नाही. आजवरच्या बॉलिवूडच्या १०० पेक्षा जास्त वर्षांच्या काळात अनेक सुपरस्टार होऊन गेले. प्रत्येक कलाकाराने त्यांचे वेगळेपण सिद्ध केले. मात्र असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या वेगळेपणासोबत त्यांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला. असाच एक बॉलिवूडचा सिघम अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजय देवगण आणि सुपरहिट हे जणू समीकरणच बनले आहे. अजयने त्याच्या दमदार अभिनयाने आणि त्याच्या ऍक्शनने सर्वांनाच वेड लावले. अजयला इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष पूर्ण झाले. अजय देवगणने त्याच्या ३० वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत तुफान यश आणि अमाप लोकप्रियता मिळवली. एकेकाळी फक्त ऍक्शनपुरता ओळखल्या जाणाऱ्या अजयने सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्याचे वर्चस्व सिद्ध केले.

अजयने त्याच्या एवढ्या मोठ्या चित्रपटांच्या प्रवासात त्याने अनेक चित्रपट केले. त्याच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चढ उतार येऊन देखील अजयने त्याचा परिणाम कधीच स्वतःवर आणि त्याच्या कामावर होऊ दिला नाही. आज सिनेमात अजय देवगण म्हटले की, सिनेमा हिट होणारच हे सर्वांना आधीच माहित असते. अजयने अनेक चित्रपट केले, मात्र त्यातल्या काही चित्रपटांमुळे त्याला सुपरस्टार हे बिरुद मिळाले आणि अजय सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. आज आपण अजयच्या अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी बॉक्स ऑफसवर बक्कळ कमाई केली.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर:
ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात अजय, काजोल, शरद केळकर, सैफ अली खान आदी अनेक मोठे कलाकार होते. १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा तुफान हिट झाला. या चित्रपटाने ३६७.६५ कोटी रुपयांची कमाई केली.

गोलमाल अगेन :
गोलमाल या सुपरहिट सिरीजमधला गोलमाल अगेन हा सिनेमा तुफान हिट झाला. या चित्रपटाने ३११.१८ कोटी रुपयांची ताबडतोड कमाई केली. या सिनेमात अजयसोबतच, परिणीती चोप्रा, श्रेयश तळपदे, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आदी कलाकार होते.

टोटल धमाल :
फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने २२८.२७ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात अजयसोबतच, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, जॉनी लिव्हर आदी अनेक कलाकार होते.

सिंघम रिटर्न :
सिंघम सिरीजचा पुढचा भाग असलेला सिंघम रिटर्न सिनेमा २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २२० कोटी रुपयांची कमाई केली होती.

गोलमाल ३:
नोव्हेंबर २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १६९ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात अजयसोबत करीना कपूर, श्रेयश तळपदे, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू हे कलाकार झळकले होते.

बोलबच्चन :
अभिषेक बच्चन, अजय देवगण, असीन, प्राची देसाई आदी अनेक कलाकारांचा असलेला हा सिनेमा यादेखील सुपरहिट झाला होता. जुलै २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १६५.६८ कोटी रुपये कमावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…


Latest Post

error: Content is protected !!