Thursday, June 19, 2025
Home भोजपूरी रितेश पांडेचे नवीन भोजपुरी गाणे झाले रिलीज, अक्षरा सिंगच्या डान्सवर चाहते फिदा

रितेश पांडेचे नवीन भोजपुरी गाणे झाले रिलीज, अक्षरा सिंगच्या डान्सवर चाहते फिदा

भोजपुरी चित्रपटसृष्टीचे नाव निघते, तेव्हा भोजपुरी गाण्यांचा उल्लेख करायला कोणीही विसरत नाही. त्यात होळीची भोजपुरी गाणी तर खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये आता ‘जोगिरा’ या होळीवरील गाण्याचाही समावेश झाला आहे. पारंपरिक संगीतावर आधारित भोजपुरी गाणी खूप लोकप्रिय होतात. अशातच भोजपुरी संगीत क्षेत्रातील सुपरस्टार रितेश पांडे आणि अक्षरा सिंग यांचे रिलीज झालेले होळीचे गाणे सर्वत्र प्रसिद्ध होत आहे.

हे भोजपुरी गाणे भोजपुरी म्युझिक अल्बम ‘पहिलका फागुन अक्षरा के…’ मधून रिलीज झाले आहे. ‘ए जिजा आई जाना हो’ हे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे अक्षरा सिंग आणि रितेश पांडे यांनी गायले आहे. मनोज मतलबी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर घुंगरूजी यांनी संगीत दिले आहे.

या गाण्याचा व्हिडिओ देखील अक्षरा आणि रितेश यांच्यावर चित्रीत केला आहे. या गाण्यावर अक्षरा सिंगने जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या गाण्यावर शेकडो कमेेंट्स मिळत आहेत आणि तिचं कौतुक करत आहेत. या गाण्याची खासियत ही आहे की, या गाण्यात पारंपरिक भोजपुरी होळीच्या संगीताची झलक आहे.

हा व्हिडिओ देखील एकदम देसी अंदाजात बनवला गेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना देखील हे गाणे खूप आवडत आहे. या गाण्याला आतापर्यंत 23 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला रितेश पांडे हिट्स या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले आहे. रितेश आणि अक्षराने या गाण्यात खूपच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा देखील या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.या गाण्याच्या लोक प्रियतेवरून हे गाणे हीट होणार असल्याचे दिसून येते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा