Saturday, June 29, 2024

Box Collection Day 2 : ‘Gadar 2’ने अवघ्या दोनच दिवसात हालवून टाकलं बॉक्स ऑफिस, ‘OMG 2’नेही घेतली भरारी

शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) दोन मोठे सिनेमे रिलीज झाले. यातील पहिला सिनेमा म्हणजे ‘गदर 2‘ होय. या सिनेमात 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी देओल ‘तारा सिंग’च्या आणि अमीषा पटेल ‘सकीना’च्या भूमिकेत दिसले आहेत. याव्यतिरिक्त दुसरा सिनेमा म्हणजे अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘ओएमजी 2‘ होय. हा सिनेमा 2012 साली आलेल्या ‘ओएमजी- ओह माय गॉड’ या सिनेमाचा सीक्वेल आहे. अशात या दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर सर्वांच्या नजरा आहेत. वृत्तांनुसार, दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे अंंदाजे आकडेही समोर आले आहेत.

‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाची क्रेझ रिलीजच्या आधीपासूनच पाहायला मिळत होती. यामुळे सिनेमाला ओपनिंग डेच्या दिवशीच प्रचंड फायदा झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी जवळपास 40 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता चाहत्यांना आशा होती की, शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) सनी देओल (Sunny Deol) याच्या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होईल. आकडे समोर आल्यानंतर असे होताना दिसतही आहे. दुसरीकडे, पहिल्या दिवसाच्या तुलनेत अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमानेही शानदार कामगिरी केली आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilkच्या रिपोर्टमध्ये, गदर 2 आणि ओएमजी 2 (Gadar 2 And OMG 2) सिनेमांच्या दुसऱ्या दिवशीचे अंदाजे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहेत. यानुसार, शनिवारी गदर 2ने 43 कोटी रुपये कमावले आहेत, तर ओएमजी 2ने 14.5 कोटी रुपये कमावले आहेत. शुक्रवारी ओएमजी 2चे कलेक्शन 10.26 कोटी रुपये होते. म्हणजेच आता अक्षयच्या सिनेमाने दोन दिवसात 24.76 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, सनीच्या सिनेमाच्या कमाईचा आकडा 83 कोटींच्या पार गेला आहे.

असे असले, तरीही ज्याप्रकारे गदर 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे, ते पाहून असे दिसते की, हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्याव्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा हादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. उत्कर्ष हा तारा सिंग याच्या मुलाच्या भूमिकेत आहे. उत्कर्ष 2001मध्ये रिलीज झालेल्या गदर सिनेमाच्या पहिल्या भागातही दिसला होता. (akshay kumar omg 2 and sunny deol gadar 2 box office collection 2 day)

महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं
श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी जान्हवीने आईला सांगितलेले ‘हे’ शेवटचे शब्द, वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

हे देखील वाचा