शाहिदसोबत भिडणार अक्षय कुमार! दिवाळीला ‘या’ दोन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; पाहा रिलीज डेट

शाहिदसोबत भिडणार अक्षय कुमार! दिवाळीला 'या' दोन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; पाहा रिलीज डेट


कोरोनाकाळात लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला तो सिनेसृष्टीला. चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबले. या काळात काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्नवर प्रदर्शीत करण्यात आले. मात्र, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची मजा मात्र प्रेक्षकांना अनुभवता आली नाही.

मात्र, अनलॉक काळास सध्या पन्नास टक्के लोकांना चित्रपटगृहात उपस्थित राहण्याची अनुमती दिली गेलीये. त्यामुळे काही प्रमाणात लोक चित्रपट पाहायला उपस्थित राहू शकतात. यात प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता होती ती यशराज बॅनरच्या चित्रपटांची, ते कधी प्रदर्शीत होतात याची.

कोरोनामुळे २०२० मध्ये रखडलेले यशराज फिल्मचे पाच मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यशराज फिल्मने याबाबत आवल्या ट्विटर अकाउंटवर याची घोषणा केली आहे. ज्यात कोणत्या तारखेला कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे याची माहिती देखील दिली गेली आहे.

चित्रपट प्रदर्शित केल्या जाणाऱ्या तारखेनुसार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट दिवाळी ला म्हणजेच ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे, म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी शहीद कपूरच्या ‘जर्सी’ ची तारीख निश्चित केली गेली आहे.

–  ‘संदीप और पिंकी फरार है’ हा चित्रपट १९ मार्चला प्रदर्शित होणार असून ह्यात दीबाकर बॅनर्जी हे हे दिग्दर्शक आहेत. तसेच या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा हे प्रमुख भूमिकेत दिसतील

– बंटी और बबली हा चित्रपट २३ एप्रिल ला प्रदर्शित होणार असून वरून शर्मा हे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी स्टाकास्ट हे या चित्रपटात भूमिका बजावणार आहेत.

– शमशेरा हा चित्रपट २५ जून ला प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. ज्यात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे तिघे प्रमुख भूमिका साकारणार आहेत

– जयेश भाई जोरदार या चित्रपटात २७ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून दिव्यांग ठक्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. तर यात रणवीर सिंग, शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

– अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा पृथ्वीवर हा चित्रपट ५ नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे तर सोबतच सोनू सूद आणि संजय दत्त देखील यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

शाहिद कपूरचा जर्सी हा साऊथ ब्लॉक बास्टर सिनेमाचा हिंदी रिमेक

शाहिद कपूर याने आपल्या जर्सी या चित्रपटाची तारीख आपल्या सोशल मिडियाद्वारे जानेवारी मध्ये सांगितली होती. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे जी भूमिका मूळ चित्रपटात नानी ने साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तीन्नोरी करत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.