मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तुझ्यात जीव रंगला‘ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण या मालिकेतील मुख्य पात्र राणादा आणि पाठक बाई हे होते. हे पात्र अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी साकारले आहे. या मालिकेतून दोघांनी घराघरात प्रसिद्ध मिळली. त्या दोघांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. दोघेपण वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतात.
अक्षया आणि हार्दिकने (Akshaya Deodhar) काही महिन्यांपूर्वीच एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. ते दोघे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांचे चाहते त्यांच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. हार्दिकने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ‘दिल चाहता है’ चित्रपटातील ‘जाने क्यू लोग प्यार करते है’ हे गाणं ऐकू ऐत आहे. त्यावर दोघांनी एक भन्नाट व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक अक्षयाला प्यार बेकार की मुसीबत है म्हणताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “दिल चाहता है की आपन लवकर भेटला पाहीजे.” दुसऱ्याने लिहिले की, “वाटल नव्हत राणादा एवढा बदलेल, पण भारी दिसते तुमची जोडी.” या व्हिडिओला 1लाखांहून अधिक लाईक आल्या आहेत. हार्दिकला इंस्टाग्रामवर 3लाख 59 हजार फाॅलवर्स आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपुर्वी हार्दिक आणि अक्षया जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतल होत. त्यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये हार्दिक क्षयाला पाच पावलं उचलून घेऊन जेजुरी गड चढताना व्हिडिओत दिसला. यामुळे त्याने जेजुरीची परंपरा जपलीअसल्याचे दिसत आहे. इतकचं नाही तर त्याने 42किलोची तलवार उचलली होती. (Akshaya Deodhar and Hardik Joshi’s ‘Jaane Kyu Log Pyaar Karte Hai’ video goes viral)
अधिक वाचा-
–अभिनेत्री सई ताम्हणकरला पाहिजे ‘असा’ जोडीदार; म्हणाली, ‘जी व्यक्ती…’
–‘या’ कारणामुळे गाण्यातच रमले किशोर कुमार; वाचा संगीताच्या बादशाहचा जीवनप्रवास