मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय जोडी राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी (दि, 2 डिसेंबर ) रोजी थाटामाटात लग्नसोहळा उरकला. ‘तुझ्यात जीव रंगला‘ या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली असून आता अवघ्या महाराष्ट्राची फेवरेट जोडी म्हणून यांना ओळखलं जातं. नुकंतच या जोडप्याच्या लग्नाला एक महिना पुर्ण झाला असून त्यांनी सोशल मीडियावर फोटो देखिल शेअर केले होते. आता अक्षयाची लग्न झाल्यानंतर ही पहिली सक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर (Aakshay Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. अशातच आता अक्षयाची लग्नानंतर ही पहिली संक्रांत आहे, त्यामुळे तिनी काळी काठपदराची साडी, नाकात नथ आणि केसात गजरा माळला असून गळ्यात मंगळसुत्र घातलं आहे, असा मराठमोळा लूक घेऊन तिने व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षयाच्या व्हिडिओसोबतच तिच्या कॅप्शनने देखिल प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सुख कळले’
View this post on Instagram
अक्षयाच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी तिला मकर संक्रातीच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, त्याशिवाय काहींनी तिच्या साडीचे आणि मेकअपचे कौतुकही केले आहे. अक्षयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. सोशल मीडियावर अक्षयाचा मोठा चाहतावर्ग आहे. लग्न झाल्यापासून हे कपल सतत चर्चेत असतं. त्याशिवाय प्रेक्षकही यांच्या फोटोंसाठी आणि व्हिडिओसोठी वाट पाहात असतता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
90 कोटींचे कर्ज चुकवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी केले दोन शिफ्टमध्ये करत इंडस्ट्रीमध्ये केले दमदार पुनरागमन
दु:खद! तारक मेहता का उल्टा चश्मा फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन