…म्हणून अली असगरने सोडला ‘द कपिल शर्मा शो’, मुलाखतीत केला मोठा खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये असे अनेक पात्र आहेत, जी आजही सगळ्यांच्या आठवणीत आहेत. याच पात्रातील एक नाव म्हणजे दादी. या शोमध्ये दादीचे पात्र अभिनेता अली असगर याने निभावले होते. हे पात्र प्रेक्षकांना एवढे आवडले होते की, जेव्हा अलीने हा शी सोडला तेव्हा त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते. परंतु त्याने हा शो आणि इतके प्रेम मिळत असताना हे पात्र का सोडले याचे कारण कोणालाही माहित नव्हते. अशातच त्याने हा शो का सोडला यामागील कारण सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना अली असगरने सांगितले की, “हे अगदी दुर्भाग्य आहे. अशा संधी येतात जेव्हा तुम्ही दरवाजात उभे असता. यावेळी तुम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागतो. मी या शोमधील स्टेजला खूप मिस करत आहे. आम्ही एका टीमप्रमाणे काम केले आहे.”

त्याने पुढे सांगितले की, “परंतु एक क्षण आला जेव्हा मला प्रोफेशन लेव्हलवर असे वाटले की, हे काही जास्त होत आहे. क्रिएटिव्ह डिफरेंसेसमुळे हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. मी हा शो सोडला कारण माझे कॅरेक्टर स्थिर झाले होते. माझे काम थांबले होते. त्यात सुधारणा करण्यात कसलाही स्कोप नव्हता.”

अली असगरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो ओटीटी शो करणार नाही. त्याने सांगितले की, “कॉमेडियनची इमेज खूप मजबूत आहे. मला नाही वाटत की, लोकांना मला इतर कोणत्याही भूमिकेत पाहायला आवडेल. मी टेलिव्हिजनवर अनेक शो केले आहेत.” अशाप्रकारे त्याने त्याच्या मुलाखतीत ‘द कपिल शर्मा’ हा शो सोडण्याचे खरे कारण सांगितले आहे.

हेही वाचा :

जया बच्चन यांनी केली अमिताभ बच्चन यांच्या दाढीची चेष्टा, कधीही न पाहिलेला व्हिडिओ आला समोर

भाग्यश्रीच्या पतीने मधुचंद्राच्या रातीबद्दल केला मजेशीर खुलासा, सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने महिला दिनानिमित्त चाहत्यांना दिला महत्त्वाचा संदेश

Latest Post