आलियाला बेबी बंप लपवण्यासाठी ८२ हजारांचा ड्रेसही पडला कमी, सर्वांसमोर ‘अशी’ झाली फजिती

0
89
Alia-Bhatt-Baby-Bump

लग्नाच्या २ महिन्यांनंतर अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. सगळे आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करू लागले. त्याचवेळी प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर, आलिया तिच्या व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, आलिया तिच्या आगामी ‘डार्लिंगस्’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला पोहोचली होती. यादरम्यान आलियाने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी बलून वनपीस ड्रेस घातला होता. यानंतर आलियाने दुसऱ्या कार्यक्रमात जाण्यासाठी प्रिंटेड सलवार सूट परिधान केला, पण लाखो प्रयत्नांनंतरही आलियाचा बेबी बंप कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घातलेला फ्लोरल प्रिंट सूट
व्हिडिओमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा सलवार सूट घातला आहे. आलियाने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी शरारा निवडले. या सूटचा कुर्ता वरून खूप सैल होता. ज्यामध्ये आलिया वारंवार तिच्या ओढणीने बेबी बंप (baby bump) झाकताना दिसत होती.

लपवू शकली नाही बेबी बंप
या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट सतत तिच्या ओढणीने बेबी बंप झाकण्याचा प्रयत्न करताना दिसली. असे असूनही, आलियाची सर्व मेहनत वाया गेली आणि व्हिडिओमध्ये तिचा मोठा बेबी बंप स्पष्टपणे दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया दिसतेय खूप सुंदर
या सलवार सूटमध्ये आलिया भट्ट अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी आलियाने मोठे कानातले घातले होते. तसेच, केस खुले ठेवले होते. यासोबतच व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत होता. जे तिच्या लूकमध्ये भर घालत होते.

आलिया भट्टने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. या फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर होती आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) तिच्या शेजारी बसलेला दिसत होता. यावेळी स्क्रीनवर एक हृदय दिसले होते. हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाखो लाईक्सचा पाऊस पाडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, कमी वयात घेतला अखेरचा श्वास
कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here