Thursday, March 28, 2024

बाबो! रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल आलियाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, ऐकून रणबीर कपूरलाही बसेल धक्का

रणवीर सिंगने (Ranveer Singh) जेव्हापासून त्याच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हापासून त्याला सतत ट्रोलचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर लोक त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.  पण जेव्हा रणवीर सिंगची जवळची मैत्रीण आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या ‘डार्लिंग’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आली तेव्हा तिने अभिनेत्याबद्दल असे काही बोलले की त्याचे उत्तर जाणून रणबीर कपूरला नक्कीच धक्का बसेल. आलिया भटचे हे विधान चर्चेत आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंन्च करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या आलियाला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी आलियाने सर्वांनाच थक्क करणारे उत्तर दिले आहे. याबद्दल बोलताना आलियाने माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल मला काहीही नकारात्मक ऐकू येत नाही. त्यामुळे मला हा प्रश्नही सहन होत नाही. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. तो फक्त माझाच नाही तर सगळ्यांचा लाडका आहे. त्याने उत्तम चित्रपट केले आहेत, त्यामुळे आपण त्याला फक्त प्रेम दिले पाहिजे.

लग्नानंतर काही दिवसांनीच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर आलिया तिच्या आगामी ‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमुळे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत आली. यावेळी, अभिनेत्री पिवळ्या बलून शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. ट्रेलर लॉन्चच्या वेळी आलियाला स्टेजवर पोहोचताच अभिनेत्रीला पाहून मीडियाने अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. आलियाला हसत हसत स्टेजवर जोरदार पोझ दिली.

आलिया भट्टच्या ‘डार्लिंग’ चित्रपटाची कथा मुंबईत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. चित्रपटातील आई आणि मुलगी (आलिया) या कथेचा केंद्रबिंदू असेल. या चित्रपटात शेफाली शाह आलियाच्या आईची भूमिका साकारणार आहे, तर आलिया तिच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जस्मिस रे रेन यांनी केले आहे. गौरी खान, गौरव वर्मा आणि आलिया भट्ट स्वतः या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

हे देखील वाचा