Wednesday, October 9, 2024
Home अन्य सौदी अरेबियामध्ये जाॅय पुरस्काराने आलियाचा सन्मान; म्हणाली ‘मला चित्रपटांचं वेड आहे’

सौदी अरेबियामध्ये जाॅय पुरस्काराने आलियाचा सन्मान; म्हणाली ‘मला चित्रपटांचं वेड आहे’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट(alia bhatt) ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता अलीकडेच सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात तिला जॉय पुरस्काराने(Joy award) सन्मानित केले आहे. यावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सौदी अरेबियातील(saudi arebia) या कार्यक्रमात आलिया तिच्या चित्रपटांवरील प्रेमाविषयी बोलताना दिसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा पुरस्कार स्वीकारताना आलिया म्हणाली, ‘या देशात असणं माझ्यासाठी सौभाग्यची गोष्ट आहे, जो देश सध्या सिनेमाच्या माध्यमातुन आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम आणि पूर्वेकडील असंख्य प्रतिभा एकाच छताखाली एकत्र येतात आणि एकमेकांचा आनंद साजरा करतात असे सहसा घडत नाही. त्यामुळे हे केल्याबद्दल धन्यवाद.

आलिया भट्ट पुढे म्हणाली, ‘ही खरोखरच एक अद्भुत रात्र आहे. मला एवढंच माहीत आहे की मला चित्रपटांचं वेड आहे. मी हे आधीही सांगितलंय मला वाटतं की, माझा जेव्हा जन्म झाला तेव्हाही ‘लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन’ म्हणल्यानंतरच मी जन्म घेतला असेल. माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ असाच आहे. जर आपण आनंदाबद्दल बोलत आहोत, तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे प्रेम. त्यामुळे आज रात्री जेव्हा मी घरी जाईल, तेव्हा मी माझ्यासोबत चित्रपटांचे प्रेम आणि रियाधमध्ये मी जे अनुभवले ते प्रेम घेऊन जाईल. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि हीच चित्रपटांची जादू आहे.’

यावेळी आलिया भट्टने लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या साडीवर सोन्याचे वर्क होते. लाइट मेकअप आणि इअररिंग्सने तिने लूक कंप्लिट केला. तिच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’ (jigra)चित्रपटात दिसणार आहे. आलियाने एका व्हिडिओद्वारे या चित्रपटाची घोषणा केली होती. धर्मा प्रॉडक्शनच्या सहकार्याने ती या चित्रपटाची निर्मिती करत आहे. आलियाचा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा