प्रेग्नेंसीमध्ये रणबीर घेतोय आलियाची ‘अशी’ काळजी; म्हणाली, ‘आता तो मला रात्री…’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या डार्लिंग चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाचे सध्या ती जोरदार प्रमोशन करताना दिसणार आहे. आलियाचा हा आगामी चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आलियाच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळीच आलियाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही खुलासा करत पती रणबीर कपूर आणि नीतू कपूर खूप काळजी घेत असल्याचे सांगितले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आलियाही तिच्या वैयक्तिक आयुष्याचा खूप आनंद घेत आहे. ती लवकरच आई होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसोबत आलिया प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. गरोदरपणात रणबीर कपूर पत्नी आलियाची विशेष काळजी घेत आहे. आलियाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती तिच्या प्रेग्नेंसीचा वेळ घरी कसा एन्जॉय करत आहे. रणबीर घरी तिची कशी काळजी घेतो आणि तो तिला कसा खास वाटतो हे तिने सांगितले आहे.

आलिया आणि रणबीर या वर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आलिया एकीकडे कामात व्यस्त आहे तर दुसरीकडे रणबीर तिची अतिरिक्त काळजी घेत आहे. आलियाने एका मीडिया पोर्टलशी बोलताना सांगितले की, रणबीर गरोदरपणात तिची कशी काळजी घेतो. आलिया म्हणाली की रणबीर नेहमीच तिची काळजी घेतो आणि आता अधिक काळजी घेणारा झाला आहे.

आलियाने सांगितले की, “रणबीर तिला चांगले वाटण्यासाठी अनेक गोष्टी करतो. रात्री मला लवकर झोपण्यासाठीही आग्रह करत असतो.” जेव्हा आलियाला विचारण्यात आले की तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर तिची विशेष काळजी घेत आहेत का? यावर आलियाने “ती सतत काम करत असल्यामुळे तिला आई आणि सासूसोबत राहायला वेळ मिळत नाही.” अलीकडेच तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट ‘हार्ट ऑफ स्टोनचे’ शूटिंग पूर्ण करून आलिया लंडनहून भारतात परतली आहे.

हेही वाचा –

‘त्यांच्यासोबत काम करणे विचित्र वाटेल’, खानमंडळीसोबत काम करण्याबाबत जान्हवीने केले मोठे विधान

अक्षय कुमारच्या ‘गोरखा’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अजूनही काम चालूच, निर्मात्यांनी केला खुलासा

‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण

Latest Post