आलिया भट्टला भेटायला आला तिचा चिमुकला चाहता; भल्यामोठ्या गर्दीतही अभिनेत्रीने दिली सेल्फी


बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे चाहते हे एक गोड समीकरण आहे. जिथे हे स्टार दिसतात तिथे चाहते गर्दी करतात. हे कलाकारांप्रती असलेले त्यांचे प्रेम असते. असचं काहीसं अभिनेत्री आलिया भट्टसोबत झाले आहे. आलिया भट्ट सध्या तिचा अनेक आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. ती मुंबईमधील एका स्टुडिओ बाहेर स्पॉट झाली आहे. तिला तिथे भेटण्यासाठी तिचा एक चाहता आला होता. तिथे तिला बघण्यासाठी अनेकांची गर्दी झाली होती.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स घातले होते. तसेच काळ्या रंगाचे शूज आणि काळ्या रंगाची टोपी घातली आहे. यावेळी तिथे तिचा बॉडीगार्ड देखील उपस्थित होता. तिला बघता क्षणीच तिथे खूप गर्दी झाली. तिला गाडीचा दरवाजा देखील उघडता येत नव्हता.

यातच तिचा एक छोटासा चाहता येतो आणि तिच्याकडे सेल्फीसाठी मागणी करतो. त्यावेळी तिने त्याला जवळ बोलावले आणि त्याला सेल्फी दिली. तिचा हा अंदाज तिथे जमलेल्या सर्वानाच खूप आवडला. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सगळेजण तिचे कौतुक करत आहेत.

आलिया भट्ट ही बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. (Alia bhatt’s special fan come to meet her, she give selfie In crowd)

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘स्टूडेंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम केले. याच एकाच चित्रपटाने तिला खूप ओळख मिळाली. यानंतर तिने ‘बद्रीनाथ की दुल्हनीया’, ‘टू स्टेटस’, ‘डियर जिंदगी’, ‘हाय वे’, ‘गल्ली बॉय’, ‘कलंक’, ‘राजी’, ‘शानदार’, ‘कपूर एंड सन’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच तिने ‘आरआरआर’ आणि ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात काम केले आहे. तिचे हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.