कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया


आपल्या देशाने अनेक संकटाना धीराने सामोरे जात स्वातंत्र्य मिळवले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात महत्वाची घटना किंबहुना एक दुर्दैवी घटना १९९९ साली घडली आणि ती म्हणजे भारत, पाकिस्तानमधले कारगिल युद्ध. जवळपास ६० दिवस झालेल्या या युद्धात भारताचा विजय तर झाला, मात्र तो आपण आपल्या ५२७ जवानांना गमावल्यावर. म्हणूनच २६ जुलै हा दिन कारगिल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या बलिदानप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या सर्व जवानांनवर आपल्या देशातील प्रत्येकालाच गर्व आहे. नुकताच आपण हा दिवस साजरा केला. या दिवशी सर्वच मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवानांना आदरांजली वाहिली.

बॉलिवूडचा सिंघम अजयने देखील या शहिदांना अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. अजयने स्वतः या जवानांवर कविता रचत या जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. अजयने त्याच्या या ‘सिपाही’ कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दात अजयने शहिदांच्या परिवारापर्यंत त्याच्या भावना पोहचवल्या आहेत. देशासाठी स्वतःच्या जिवावर उदार होणाऱ्या सैनिकाच्या शहीद झाल्यानंतर, परिवारासाठी हिंमत वाढवणारा संदेश अजयने त्याच्या ‘सिपाही’मधून मांडला आहे. (ajay devgan poem and gives tribute to indian soldiers)

अजयच्या या कवितेवर खिलाडी कुमार अक्षयने कौतुक करत ट्विटरवर लिहिले, “जेव्हा खऱ्या आयुष्यात भावनांबद्दल बोलण्याची वेळ येते, तेव्हा मी स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकत नाही. मात्र आज अजयने माझ्या डोळ्यात अश्रू आणले आहे. मला माहित नव्हते की, तुझ्यात एक कवी देखील लपलेला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी मन जिंकशील मित्रा.”

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ सिनेमात दिसणार असून हा सिनेमा १३ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त त्याचे ‘मेडे’ आणि ‘आरआरआर’ सिनेमे देखील प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.