Sunday, July 14, 2024

दु:खद! गंभीर आजारनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कलाविश्वावर शोककळा

बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा झटका बसला आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती(Sonali Chakraborty) यांचे निधन झाले आहे. सोनाली चक्रवर्तीने 31 ऑक्टोबर रोजी सकाळी कोलकाता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोनाली चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकाकुल झाली आहे.

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा होता. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सोनाली चक्रवर्तीने हिट बंगाली टेलिव्हिजन मालिका गाचोरा(Gaatchora) मध्ये काम केले होते. सोनाली चक्रवर्तीने अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये आलेल्या ‘हर जीत’ या सिनेमातील सोनाली चक्रवर्तीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. ‘बंधन’ या सिनेमातील त्यांची भूमिकाही गाजली होती.

गेल्या काही काळापासून आजारपणामुळे सोनाली चक्रवर्तीने टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीपासून दूर होत्या. या वर्षी ऑगस्टमध्ये सोनाली चक्रवर्तीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांचे पती शंकर यांनी अशी माहिती दिली होती की लिव्हरच्या समस्येमुळे सोनाली यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या पोटात पाणी जमा झाले होते. याशिवाय इतरही काही आजारांशी त्या तोंड देत होत्या. ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता.

मात्र, यानंतर त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. आता सोनालीचे काय झाले आणि कोणत्या समस्येवर रुग्णालयात भरती होत्या याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यांची मृत्यूशी सुरू असणारी ही झुंज 31 ऑक्टोबर रोजी संपली. सध्या सोनाली चक्रवर्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशिवाय अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियावरही तिला श्रद्धांजली वाहतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात? म्हणाली,’जुन्या गोष्टी विसरलो…’

‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

हे देखील वाचा