प्रेक्षकांसाठी खुशखबर! चित्रपटगृहांमध्ये धमाल केल्यानंतर, ओटीटीवर रिलीझ होण्यासाठी सज्ज झाला ‘पुष्पा’


दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सध्या चर्चेत असलेला चित्रपट ‘पुष्पा’, १७ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच उत्साह होता. बॉक्सऑफिस वर धुमाकूळ करण्याआधी चित्रपटाने सोशल मीडियावर बरीच धमाल केली होती. शुक्रवारी चित्रपटगृहांच्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर, ‘पुष्पा’ हिट ठरला. यामुळे चित्रपट निर्माते आणि पुष्पाच्या स्टार कास्टमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांना सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाता आले नाही, त्यांना हा चित्रपट बघण्याची उत्सुकता वाटत आहे. कोव्हिडमुळे किंवा इतर काही कारणास्तव तुम्ही हा चित्रपट सिनेमागृहात पाहून शकला नसाल, तर काही हरकत नाही. कारण आता ‘पुष्पा: द राइज’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुमचे मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा: द राइज’चे राइट्स ॲमेझॉन प्राईमला विकले गेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओटीटीवर प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. हा ब्लॉकबास्टर चित्रपट जानेवारी २०२२ पर्यंत ॲमेझॉन प्राईमवर येण्याची शक्यता आहे. (allu arjun starrer film pushpa release on ott platform)

चंदन तस्करीच्या जीवनातील घटकांवर आधारित
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची कथा आंध्रप्रदेशच्या डोंगरावरील लाल चंदनाच्या तस्करीवर बनवलेला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात चंदन तस्करांच्या जीवनातील खऱ्या घटकांचे चित्रण करण्यात आले आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असला, तरी त्यात यामध्ये रोमान्स आणि दमदार इमोशन्सही आहेत. या चित्रपटाला दोन भागामध्ये बनवले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना
अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित काम केले आहे. या चित्रपटात रश्मिका स्त्रिवली नावाच्या मुलीच्या भूमिकेत आहे. अल्लू अर्जुन अर्थात पुष्पा राज तिच्यावर खुप प्रेम करत असतो.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!