अल्लू अर्जुनचे चाहते इव्हेंटमध्ये झाले जखमी, अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली माहिती


अभिनेता अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नव्हे, तर संपूर्ण जगभरात पसरला आहे. त्याचा कोणताही चित्रपट आला तर त्याच्यापेक्षा त्याचे चाहते जास्त उत्साहित असतात. अल्लू अर्जुन लवकरच त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. तेव्हापासून त्याचे सगळे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा चाहत्यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शेवटच्या क्षणी त्याने हा निर्णय रद्द केला आहे. सोमवारी (१३ डिसेंबर) रोजी तो त्याच्या चाहत्यांना भेटणार होता त्याच्यासोबत फोटो काढणार होता. या इव्हेंटमध्ये २०० लोकांना बोलावले होते. परंतु चाहत्यांची वाढती संख्या पाहून अभिनेत्याने हा इव्हेंट कॅन्सल केला.

त्याचा हा निर्णय ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप राग आला आणि त्यांनी तिथेच तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तिथे येऊन सगळी स्थिती सांभाळली. परंतु तोडफोड करताना काहीजणांना जखम झाली. यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून सांगितले की, “मला झालेल्या घटनेबाबत समजले आणि हे देखील समजले की, माझ्या काही चाहत्यांना जखम झाली आहे. ही परिस्थिती माझी टीम हाताळत आहे. मी भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेईल.”

अल्लू अर्जुनने पुढे सांगितले की, “तुमच्या सगळ्यांचे प्रेम माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि मी कोणालाच गृहीत धरतात नाही.” याआधी त्याने त्याच्या टीमला सोन्याची अंगठी दिली होती. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे आणि हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहे.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

 


Latest Post

error: Content is protected !!