×

‘पुष्पा’ सिनेमानंतर अल्लू त्याच्या आगामी ‘या’ चित्रपटांमधून करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

बॉक्स ऑफिसवर मागील काही दिवसांपासून फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची हवा आहे आणि तो सिनेमा म्हणजे, ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise). डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमे अजूनही बॉक्स ऑफिसवर धमाका चालू ठेवला आहे. या सिनेमातील कथा, गाणी, संवाद, डान्स सर्वच गाजत आहे. सोबतच अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाने या सिनेमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. या सिनेमामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेमध्ये अधिकच भर पडली असून, त्याच्याकडे चित्रपटांची मोठी रंग लागली आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनतर बॉक्स ऑफसवर ३०० कोटींची कमाई केली आहे.

https://www.instagram.com/p/CY1nTOfP8wt/?utm_source=ig_web_copy_link

अल्लू अर्जुनाचा आगामी सिनेमांबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊया. अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा सुपरहिट झाल्यामुळे चित्रपटाच्या टीमने सिनेमाचा पुढील भाग काढण्याचे ठरवले आहे. ‘पुष्पा: द रूल पार्ट 2’ (Pushpa: The Rule Part 2) असे या नवीन सिनेमाचे नाव असणार आहे. एका रिपोर्टनुसार हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो.

https://www.instagram.com/p/CY1nTOfP8wt/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमांमध्ये डायरेक्टर बोयापती श्रीनू (Boyapati Srinu) यांच्या एका सिनेमाचा समावेश आहे. अजून या सिनेमाचे नाव ठरले नसले तरी हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात तुफान ऍक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून, लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरु केली जाणार आहे. याशिवाय त्याच्या ‘आयकॉन’ (ICON) हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगड़े (Pooja Hegde) आणि कृति शेट्टी (Krithi Shetty) या दोन अभिनेत्री दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CRvymB_LYTx/?utm_source=ig_web_copy_link

‘आयकॉन’ सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर अर्जुन केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांच्या नवीन सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे अजून नाव ठरले नसले तरी हा एक ऍक्शनपट असणार आहे. यानंतर तो AA21 या सिनेमात दिसणार असून, हा चित्रपट कोरातला शिवा (Koratala Siva) दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे.

हेही वाचा-

Latest Post