‘विकी भाऊ अन् कॅटरिना वहिनी यांना लग्नाच्या शुभेच्छा’, म्हणत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केली लक्षवेधी कमेंट


बॉलिवूडमधील बहुचर्चित लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. मागील अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या. मागील काही वर्षांपासून ते रिलेशनमध्ये आहेत परंतु त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. तसेच त्यांच्या लग्नाबाबत देखील काहीच माहिती दिली नव्हती. अशातच गुरुवारी (९ डिसेंबर) रोजी या जोडीचा लग्न सोहळा पार पडला आहे. लग्न होताच या जोडीने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील सप्तपदी घेताना आणि वरमाळा घालताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

त्या दोघांनी सारखेच फोटो सारखेच कॅप्शन देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून त्यांनी लिहिले की, “या नवीन प्रवासाची एकत्र सुरुवात करताना तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद तसेच आम्हाला या क्षणापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आमच्या अंतःकरणात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे.” त्यांचे हे फोटो पाहून बॉलिवूडमधील अनेक कलाकार तसेच त्यांच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच मराठमोळा अभिनेता अमेय वाघ याची या पोस्टवरील कमेंट मात्र चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. (Amey wagh give comment on katrina kaif wedding photos)

अमेयने विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट केली आहे की, “विकी भाऊ आणि कॅटरिना वहिनी यांना लग्नाच्या शुभेच्छा.” त्यांची ही कमेंट अनेकांना आवडली आहे. त्याच्या या कमेंटला अनेकांनी उत्तर दिले आहे. तसेच सध्या त्याची ही कमेंट चांगलीच चर्चेत आहे. तसेच बाकी बऱ्याच मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

amey wagh comment on katrina and vicky photo
Photo Courtesy: Instagram/katrinakaif

विकी आणि कॅटरिनाने माध्यमांना अधिकृत माहिती न देत राजस्थानमध्ये लग्न केले आहे. तसेच नुकतेच त्यांच्या हळदीचे फोटो देखील समोर आले आहेत. तिने नुकतेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!