‘सर्कशीतल्या वाघाचा त्रास होतोय…’, अमेय वाघ अन् सुमित राघवनची सोशल मीडियावर जुंपली

0
97
amey wagh sumeet raghvan
Photo Courtesy: Instagram/ SumeetRaghvan /AmeyWagh

सोशल मीडियावर सध्या दोन मराठी कलाकारांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. हे दोन कलाकार म्हणजे अमेय वाघ आणि सुमित राघवन. अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) सोशल मीडियावर सुमित राघवन (Sumeet Raghvan) ला टॅग करत एक खळबळजनक पोस्ट केली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अमेयच्या या पोस्टला अभिनेता सुमित राघवननेही त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी अभिनेता अमेय वाघने त्याच्या फेसबूक अकाउंटवरुन 25 सप्टेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने “जंगलात राघू कितीही असले तरी वाघ मात्र एकच असतो” असे लिहले होते. त्याचबरोबर त्याने या पोस्टमध्ये अभिनेता सुमित राघवनलाही टॅग केले होते. अमेयच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उत आला होता. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यातील वादाचे कारणही विचारले होते.  मात्र आता अभिनेता सुमित राघवननेही त्याच्या या पोस्टला सडेतोड उत्तर देणारी पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये अभिनेता सुमित राघवनने “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय…कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी,” असे म्हणत जोरदार टिका केली आहे. त्याचबरोबर सुमित राघवनने “घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे…आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे,” अशी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या सोशल मीडियावरील वादाने चाहतेही चांगलेच गोंधळात पडले आहेत.

sumit raghvan
Photo Courtesy: Facebook/ sumeet Raghvan

अनेकांनी त्यांच्या या वादातित पोस्ट म्हणजे प्रमोशनचा नवीन फंडा असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दलचे कुतुहल वाढवण्याची कला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- जान्हवी पुन्हा पोहोचली ट्रोलर्सच्या पत्त्यावर! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
रश्मिकाचे हटके फोटोशूट!
आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here