Amisha patel on bollywood|मित्रांनो यावर्षी ‘गदर 2’ हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने सगळ्यांनाच आकर्षित केले. या चित्रपटामुळे अमिषा पटेल हे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा चांगली चर्चेत आलेली आहे. या चित्रपटानंतर सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावली आहे. या आधी अमिषा आणि सनी यांनी 2018 साली आलेल्या भैयाजी सुपरहिट या चित्रपटात एकत्र काम केले होते परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगला चालला नाही. परंतु गदर टू च्या यशानंतर आता अमिषा पटेल आणि सनी देऊन यांचा चांगलाच बोलबाला चालू आहे.
नुकतेच एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिषा पटेल (Amisha patel) यांनी सांगितले की, या आधी तिच्या अनेक असे चित्रपट होते जे बॉक्स ऑफिसवर चालले नाही आणि त्यामुळे तिला सगळ्यांनी टार्गेट केले. त्यावेळी तिला कोणाचाही सपोर्ट नव्हता.
यावेळी अभिनेत्रीने सांगितले की तिच्यासोबत अशा प्रकारे वर्तणूक केली गेली कारण तिला कोणत्याही प्रकारचे फिल्मी बॅकग्राऊंड नव्हते. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना फिल्मी बॅकग्राऊंड आहे त्यामुळे त्यांना नेहमीच सपोर्ट मिळतो परंतु तिला तसा कोणताही सपोर्ट नसल्यामुळे लोक तिला टार्गेट करत होते.
यापुढे आमिष सांगितले की, “मला कोणत्याही प्रकारची फिल्मी बॅकग्राऊंड होते त्यामुळे मला कोणताही गॉडफादर नव्हता त्यामुळे जर माझा चित्रपट चालला असता तर मला खूप मोठे सन्मान देखील मिळाले असते आणि अनेक मोठे चित्रपटाच्या ऑफर देखील आला असत्या. परंतु जे झालं ते खूप चांगलं झालं कारण की कदाचित मी ब्लॉकबस्टर हिट देण्यासाठीच बनले आहे.”
अभिनेत्रीने या मुलाखतीत असे देखील सांगितले की, जेव्हा बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट चालला नाही ते व त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर आमिषाने सांगितले की, “अशा परिस्थितीत मी त्या चित्रपटाची कोणतीही फी घेतली नाही मला असे वाटते की एखादी व्यक्ती खरच अडचणीत असेल तर आपण त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. त्यावेळी मी फीज घेतली नाही हे मला कुणीही सांगितले नाही परंतु मी त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि स्वतः हा निर्णय घेतला.”
अमिषा पटेल आणि सनी देओल यांचा ‘गदर’ हा चित्रपट दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने सगळ्यांचीच मने घेतली होती परंतु आता तब्बल दहा वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज झाला त्यामुळे हा चित्रपट चालेल की नाही अशी अनेकांना शंका होती परंतु या चित्रपटाने भरघोस कमाई केली आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास 500 करोड रुपयांचा गल्ला जमवला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
अधिक वाचा –
बॉबी नव्हे तर ‘हा’ होता ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा! आज असते तर करियरची पन्नाशी पूर्ण झाली असती…
अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा