अरुणिता कांजिलालच्या गायकीवर अमित कुमार झाले फिदा; ऐकवला किशोर कुमार आणि एस. डी. बर्मन यांचा मजेशीर किस्सा

amit kumar became a fan of arunita kanjilal narrated father kishore kumar and s d burman


सोनी टीव्हीचा ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रियॅलिटी शो, आजकाल टीव्ही जगतात धमाल करत आहे. या आठवड्यात किशोर कुमार यांच्या १०० गाण्यांचा खास एपिसोड सादर करण्यात येईल. हा शो देशातील उत्कृष्ट संगीत प्रतिभेला सादर करत आहे आणि सतत एकापेक्षा एक महान गायकांना पुढे आणत आहे.

या आठवड्यात तर हा शो आणखी धमाकेदार ठरणार आहे. गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार शनिवार व रविवारच्या शोमध्ये खास पाहुणे म्हणून येणार आहेत. शोचे सर्वोत्तम स्पर्धक त्यांच्या शानदार परफॉर्मन्सद्वारे, प्रेक्षकांना ९० च्या दशकाच्या सुवर्णकाळात घेऊन जातील.

त्याचवेळी शोची प्रसिद्ध गायक अरुणिता कांजिलाल, अमित कुमार यांच्यासमोर ‘तेरे बिना जिंदगी से कोई’, ‘शोखियों में घोला जाए’ आणि ‘भीगी भीगी रातों में’ अशी गाणी सादर करताना दिसणार आहे. अरुणिताची गाणी ऐकल्यानंतर अमित तिच्या आवाजाने खूप प्रभावित झाले आणि म्हणाले की, अरुणिताने इंडस्ट्रीवर अवलंबून न राहता स्वत: ची गाणी कंपोज केली पाहिजेत, ती खूप हुशार गायिका आहे. ज्यामुळे तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करावी.

त्याचवेळी अरुणिताचे गाणे ऐकल्यानंतर, अमित कुमार यांनी ‘शोखियों में घोला जाए’ या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला. हे गाणे ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटातील आहे. अमित यांनी सांगितले की, “प्रेम पुजारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी माझे वडील किशोर कुमार जी हे एस.डी. बर्मन जी यांची गंमत करत म्हणाले होते की, ते एसीच्या थिएटरमध्ये बसणार नाहीत, कारण त्यांना घशात त्रास होत आहे. एसीमध्ये त्यांना अस्वस्थ वाटते, म्हणून त्यांनी एस.डी. बर्मन जी यांना हा चित्रपट एअर कंडिशनर नसलेल्या थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास सांगितले होते.” जो एक मोठा विनोद होता.

अरुणिताचे कौतुक करताना अमित पुढे म्हणाले की, “मला तुझा चेहरा फारच खोडकर वाटतो आणि मला तुझ्यासाठी ‘चेहरा है या चांद खिला है’ हे गाणे गायची इच्छा आहे. आजच्या जगात तू प्लेबॅक आवाज नाही, उलट तू सुपरस्टारचा आवाज आहेस. तुझ्याकडे अपार क्षमता आहे. तुझ्यासारखा अनोखा आवाज दुसर्‍या कोणाकडेही नाही.” त्यानंतर, अमित जी आणि अरुणिता यांनी ‘क्या यही प्यार है’ वर एक ड्युएट गीत गायले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


Leave A Reply

Your email address will not be published.