दारुच्या ब्रॅंन्डची जाहिरात नाकारल्यानंतर आली धमकी, अभिनेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक

0
53
amit sadh
Photo Courtesy: instagram/ theamitsadh

बॉलिवूड कलाकार सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खानला एका जाहिरातीमुळे जोरदार ट्रोल करण्यात आले होते. आता बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अमित साध सध्या एका जाहीरातीमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अमित साध हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे.अमितने ‘ब्रीद’, ‘यारा’, ‘आवरोध: द सीज विदीन’ आणि ‘जीत की जिद’ यांसारख्या वेब सीरिजमधील त्याच्या अलीकडच्या कामगिरीने आपल्याला प्रभावित केले आहे. बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अमित साधने अलीकडेच एका दारूच्या ब्रँडची जाहिरात नाकारली. त्यानंतर कोणतीही कंपनी त्याची जाहिरात करणार नाही, अशी धमकी त्याला देण्यात आली. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्याने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच अमित साधने एका अल्कोहोल ब्रँडची जाहिरात ऑफर नाकारली होती आणि सांगितले की ते व्यसनास कारणीभूत असलेल्या आणि आरोग्यासाठी चांगले नसलेल्या कोणत्याही गोष्टीचा प्रचार करणार नाही. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तो म्हणाला की  “मी प्रोटीन शेक विकणार नाही कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत.”

अमित साठ पुढे म्हणाला की, त्यांनी मला कोट्यवधी दिले तरी मी ते कधीच घेणार नाही. मी याची हमी देतो. मी कधीही कोणत्याही अल्कोहोल ब्रँडचा प्रचार करणार नाही. आपण पिऊ नये. हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. आपण जागरूक राहिले पाहिजे. तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसलेल्या कोणत्याही गोष्टीचा मी प्रचार करणार नाही.”

त्याचबरोबर पुढे बोलताना अमितने सांगितले की, “हे ऐकल्यानंतर जर ब्रँड मला जाहिरातींच्या ऑफर देऊ इच्छित नसतील, तर माझी जाहिरात करू नका. हे बरोबर आहे. मी एक अभिनेता आहे, मला खूप काम आहे आणि खूप पाठिंबा आहे. भीती नाही. मी इथे जाहिरात करायला नाही तर अभिनय करायला आलो आहे. यासोबतच त्याने सांगितले की, ज्या आंतरराष्ट्रीय दारूच्या ब्रँडला मी मान्यता देण्यास नकार दिला, त्याबद्दल ते लोक खूश नव्हते.”

हेही वाचा – मनीषा कोइरालासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नाना पाटेकर म्हणाले, ‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’
‘ब्रह्मास्त्र’चे दोन दिवसाचे कलेक्शन पाहून बरळली कंगना; म्हणाली, ‘मला करणचा इंटरव्यू घ्यायचा आहे’
लाखो तरुणांची धडकन असणाऱ्या ऋता दुर्गुळेने अशी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या तिचा प्रवास

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here