Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आज OTT वर प्रदर्शित होणार चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आज OTT वर प्रदर्शित होणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्या ‘झुंड‘ (Jhund) या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाकडून ओटीटीवर प्रदर्शित होण्यास परवानगी मिळाली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आता OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीजसाठी सज्ज आहे.

खरं तर, झुंडच्या निर्मात्यांवर कॉपीराइटचे आरोप होते, त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती दिली आणि ९ जून ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

चित्रपटात अमिताभ बच्चन विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत, ज्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल संघ तयार करण्यासाठी प्रेरित केले. विजय हा सेवानिवृत्त प्राध्यापक असून एके दिवशी बस्तीच्या मुलांना पावसात ड्रम वाजवून फुटबॉल खेळताना पाहून वाटतं की त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते उत्तम खेळाडू होऊ शकतात. या चित्रपटाची कथा यावर आधारित आहे.

‘झुंड’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj manjule) यांनी केले आहे. याची निर्मिती कृष्ण कुमार, सविता राज हिरेमठ, कृष्ण कुमार, राज हिरेमठ, कृष्ण कुमार, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा, नागराज पोपटराव मंजुळे आणि संदीप सिंग यांनी केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रिंकू राजगुरू, विकी कादियन, गणेश देशमुख, आकाश ठोसर, किशोर कदम आदी कलाकार आहेत.

हेही वाचा-

Vindu Dara Singh Birthday: सुरुवातीच्या काळात सलमान खानसोबत काम केल्याने वडिलांसारखी ओळख निर्माण करता आली नाही

वयाच्या १९ व्या वर्षांपासून सुरु झाला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचा प्रवास

शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने दिली पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

हे देखील वाचा