विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्याने एंड्रिया जेरेमिया झाली होती डिप्रेशनची शिकार, स्वतःला ‘असे’ सावरले


गायिका आणि अभिनेत्री एंड्रिया जेरेमिया थलापथी विजयच्या ‘मास्टर’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ती तिच्या चित्रपटांसाठी तसेच वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत आहे. एंड्रिया जेरेमिया मंगळवारी (२१ डिसेंबर) तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊया. ज्याच्यामुळे ती एकदा झाली होती डिप्रेशनची शिकार.

एका कार्यक्रमात एंड्रियाने (Andrea Jeremiah) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता की, ती एकदा विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यामुळे ती डिप्रेशनमध्येही गेली. बंगळुरू येथे एका कविता संग्रहाच्या प्रकाशना दरम्यान तिला विचारण्यात आले की, तिने अशी उदास लेखणी का लिहिली, त्यामागील वेदना काय आहे? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, तिचा जोडीदार तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो. यामुळे ती डिप्रेशनचीही शिकार झाली होती.

एंड्रियाने पुढे सांगितले की, ती यापासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेद डिटॉक्स प्रोग्राममध्ये सामील झाली होती आणि काही दिवस कामातून ब्रेक देखील घेतला होता. मात्र, बरी झाल्यानंतर ती पुन्हा कामावर रुजू झाली. याशिवाय, जर आपण एंड्रियाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तिने ’पचाइकिली मुथुचाराम’सोबत अभिनय सुरू केला. हा चित्रपट गौतम वासुदेव यांनी दिग्दर्शित केला होता.

माध्यमांतील वृत्तानुसार, एंड्रिया सर्वात जास्त चर्चेत आली जेव्हा ती एमएमएस स्कँडलमध्ये अडकली होती. तमिळ सिनेमाचे संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंद्र यांना किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर या दोघांची बरीच चर्चा झाली होती.

मात्र, यानंतर एंड्रिया आणि अनिरुद्धचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. या व्यतिरिक्त ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यासह ती स्वतःला कामात व्यस्त ठेवणे देखील पसंत करते.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!