Sunday, July 14, 2024

‘विवाह’च्या लाजाळू पूनमने उघडला तिच्या हनिमूनचा रियल अल्बम, दाखवले ‘असे’ फोटो अन् व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने (Amrita Rao) आरजे अनमोलसोबतच्या तिच्या सिक्रेट वेडिंगचा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सध्या या जोडप्याला एक मुलगा देखील आहे आणि ते त्यांचे सुखी वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. अमृता राव आणि आरजे अनमोल त्यांच्या यूट्यूब चॅनल ‘कपल ऑफ थिंग्स’वर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित मनोरंजक भागांची सिरीज शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत आता लेटेस्ट भागात या जोडप्याने त्यांचा हनिमून अल्बम उघडला आहे. 

गुपचूप केले होते लग्न
अमृता आणि अनमोल यांनी खुलासा केला होता की, त्यांनी १५ मे २०१६ला नाही, तर साल २०१४ मध्ये गुपचूप लग्न केले होते. बऱ्याच काळापासून या जोडप्याने त्यांचे नाते मीडिया जगतापासून दूर ठेवले. मात्र, लग्नाच्या घोषणेनंतर हे कपल त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (amrita rao rj anmol releases honeymoon vlog after 8 years of secret wedding)

हनिमूनवर दाखवली सिझलिंग स्टाईल
अमृता रावने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा पती अनमोलसोबतचा हनिमूनचा एक जबरदस्त फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अमृता सुंदर स्ट्रॅपलेस जंपसूटमध्ये पोझ देताना दिसत आहे. त्याचवेळी अनमोल शर्टलेस दिसला आणि त्याने पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले होते. हा फोटो शेअर करत, अमृताने तिच्या व्लॉगबद्दल माहिती दिली. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “#CoupleOfThingsच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आमच्या हनीमूनमधील ५० न पाहिलेले फोटो.”

हनिमून व्लॉग झाला रिलीझ
त्याच बरोबर अमृता आणि आरजे अनमोल यांनी त्यांचा व्लॉग यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये त्यांनी आपल्या हनिमूनचे एकामागून एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना दाखवले आहेत.

संपूर्ण व्लॉगमध्ये अमृता आणि अनमोलची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे. यापूर्वी १५ मार्च २०२२ रोजी अमृताने अनमोलसोबतच्या तिच्या लग्नाचा पहिला फोटो पोस्ट केला होता. फोटोमध्ये अमृता लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी तिचा पती अनमोलने स्लीव्हलेस जॅकेटसह पिवळा कुर्ता परिधान केला होता. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा