×

जेव्हा दोन नृत्यांगणा येतात आमने सामने! ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार अमृता-प्राजक्ताच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी

सध्या अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकच्या (Prasad Oak) ‘चंद्रमुखीची’ सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटातील ठसकेबाज लावणी, दमदार गाणी आणि तोऱ्यात मिरवणाऱ्या चंद्राचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे. तसेच या चित्रपटात चंद्राच्या भूमिकेत असलेल्या अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) घायाळ करणाऱ्या अदांनी आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटात फक्त अमृता खानविलकरचं नाही तर अभिनेत्री प्राजक्ता माळीही (Prajkta Mali) तिला जोरदार टशन देताना दिसणार आहे. त्यामुळे या लोकप्रिय अदाकारांची जुगलबंदी पाहायला चाहते उत्सुक झाले आहेत. 

सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीच्या डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. दोघीही लावणीच्या फडात सवाल जबाबाचा कार्यक्रम रंगवताना दिसणार आहेत. त्यामुळे मराठी सिने जगतातील दोन दमदार अभिनेत्रींच्या लावणीची आणि नृत्याची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून, त्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. हा बहुचर्चित चित्रपट २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ज्यामध्ये राजकीय नेता दौलत देशमाने आणि लावणी करणारी चंद्राची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारेने प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठार यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post