×

अमृता खानविलकरच्या ‘चंद्रा’ने देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही घातली भुरळ, पोस्ट होतेय व्हायरल

सध्या मराठी सिनेजगतात अभिनेत्री अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) चंद्राने सर्वांनाच भुरळ घातलेली पाहायला मिळत आहे. गेले अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील गाणी आणि चंद्राच्या लूकने सर्वांनाच घायाळ केले आहे. अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या गाण्यांचे आणि लूकचे फॅन झाले असून सोशल मीडियावर जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये फक्त मराठी कलाकारच नव्हे, तर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही मागे नाहीत. नुकतेच अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) या चित्रपटाचे खास पोस्ट करत कौतुक केले आहे. सध्या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. 

अभिनेता आणि निर्माता प्रसाद ओकच्या चंद्रमुखी या चित्रपटाची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि चंद्राच्या लूकने चांगलेच वेड लावले आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे हा दौलत देशमानेच्या भूमिकेत, तर अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. खुद्द बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही चित्रपटाबद्दल खास पोस्ट करत कौतुक केले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत प्रियांकाने चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. तसेच २९ एप्रिलला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले आहे. सध्या प्रियांकाच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकरेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पुणे मेट्रोमध्ये धमाकेदार डान्स केला होता. ज्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. आता प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. पडद्यावर चंद्रा आणि दौलतरावांची प्रेमकथा पाहायला सगळेच आतुर झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post