Thursday, April 17, 2025
Home मराठी ‘हीच पोझ द्यावीशी वाटते’ म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरने शेअर केला अनोख्या अंदाजातील फोटो

‘हीच पोझ द्यावीशी वाटते’ म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरने शेअर केला अनोख्या अंदाजातील फोटो

‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा रंगवत असते. दरदिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे वेगवेगळे पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधत. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

अमृता खानविलकरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने एका अनोख्या अंदाजा पोझ देताना दिसत आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची रीप्ड जीन्स परिधान केली आहे. यात आपण पाहून शकतो की, अमृता सोफ्यावर झोपली आहे. तसेच हातातील फोनमध्ये बघत, तिने पाय वर करून पोझ दिली आहे. तिचा हा फोटो चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.

अमृताने तिचा हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ती पोझ, जी मला नेहमीच करावीशी वाटते.” तिच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा