Saturday, April 20, 2024

अनन्या पांडेने केले आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट; तिच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर लावली आग

शिमरी फ्रिल स्कर्टसोबत लेदर ब्रालेट, जॅकेट त्यावर तिचे कर्ली हेयर्स आणि न्यूड मेकअप तिच्या लुकला चार चाँद लावत आहे. या फोटोंमध्ये अनन्याचा ऍटीट्युड तिच्या फोटोंना क्लासी टच तर देत आहेच, तिचे स्मोकी डोळेही तिच्या लुकला परफेक्ट कॉम्प्लिमेंट करत आहे. तिचे फोटो फक्त फॅन्स नाही, तर कलाकरांना देखील खूप आवडत असून, तशा कमेंट्स देखील तिला येत आहे.

अनन्याने हे फोटोशूट एका आलिशान गाडी समोर उभे राहून केले असून, अनन्याने हे फोटो शेअर करताना फॅन्सला या लूकबद्दल काय वाटते असा प्रश्न विचारला आहे. तिचे हे बोल्ड फोटो थोड्याच काळात सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, यावर फॅन्सने फायरच्या ईमोजी कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत आगामी ‘लायगर’ सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा