‘हम तो तेरे आशिक है’ मालिकेच्या आठवणीत प्रसाद ओकने शेअर केली पोस्ट; चाहते करतायेत मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची मागणी


झी मराठी चॅनलवर प्रसारित होणारी ‘हम तो तेरे आशिक है’ ही कॉमेडी मालिका खूप लोकप्रिय झाली होती. आगळी वेगळी कथा आणि आणि कलाकारांच्या विनोदी अभिनयाने या मालिकेला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवलं होतं. सोबतच यातील कलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन जवळपास २- ३ वर्षे लोटली आहेत. मात्र तरीही यातील पात्रं त्यांच्या मनात कायम आहेत.

या मालिकेत शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन जोडप्यांची कहाणी दाखवण्यात आली होती. ज्यांची भूमिका प्रसाद ओक व दीप्ती केतकर आणि पुष्कर श्रोत्री व माधवी कुलकर्णीने साकारली होती. या जोडप्यांना चाहत्यांकरून खूप प्रेम मिळाले होते. आता याच जुन्या आठवणींना उजाळा देत, अभिनेता प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.

प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जो एक थ्रोबॅक फोटो आहे. या फोटोमध्ये प्रसाद ओकसोबत अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील पाहायला मिळत आहे. यात दोघांनी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवले आहे. त्यांचा हाच अंदाज त्यांच्या विनोदी व्यक्तिरेखेचं दर्शन घडवून देतो. हा फोटो शेअर करत प्रसादने कॅप्शनमध्ये ‘हम तो तेरे आशिक है’ असं लिहिलंय. सोबतच त्याने हा थ्रोबॅक फोटो असल्याचेही सांगितले आहे.

प्रसादने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनीही मालिकेबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. चाहते या मालिकेला किती मिस करत आहेत, हे त्यांनी केलेल्या कमेंट्सवरून सहज लक्षात येऊ शकते. याशिवाय नेटकरी फोटोवर कमेंट करून मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. इतकेच नव्हे तर काहींचे म्हणणे आहे की, या मालिकेचा दुसरा सीझनही यायला हवा. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या मालिकेने प्रेक्षकांचे किती मनोरंजन केले असेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.