Thursday, November 30, 2023

अनिल कपूरच्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा झक्कास फोटो

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता अनिल कपूर(Anil Kapoor) यांचे नाव सर्वात वर आहे. त्यांच्या काम करण्याच्या उत्साहावरून त्यांच्या वयाचा अंदाजच बांधता येत नाही. ६५ वर्षीय अनिल कपूर अजूनही अतिशय फीट आणि तंदुरुस्त आहेत. ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत.

बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. कलाकारांचे डुप्लिकेट इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहेत. अशातच डुप्लिकेट कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरे तिसरे कोणते नसून बॉलिवूडचे फॉरेव्हर यंग म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर आहेत. अनिल कपूरच्या डुप्लिकेटने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनिल कपूर सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून अनिलचे चाहते थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

अनिल कपूरसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती अमेरिकेतील आहे. अनिल कपूरसारखा दिसणारा जॉन अफर अमेरिकेत फिटनेस प्रशिक्षक आहे. जॉन अफरने नुकताच त्याच्या इन्स्टागामवर त्याचा आणि अनिल कपूरचा कोलाज केलेला एक फोटो शेअर केला. यामध्ये एकीकडे जॉन एफर बॉडी फ्लॉंट करताना मिरर सेल्फी घेत आहे. तर दुसरीकडे अनिल कपूरचा जुना फोटो आहे. हा कोलाज शेअर होताच व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

जॉन अफर अनिल कपूरच्या तरुणपणीसारखा दिसत आहे. फोटो शेअर करत जॉनने लिहिलं की, मी बॉलीवूडमधील स्टार अभिनेते अनिल कपूर यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. जॉननं त्याचा फोटोमधे अनिल कपूर यांना टॅगही केला आहे. सध्या या पोस्टवर भरभरुन कमेंट येताना दिसतायेत. ‘अमेरिकेतील अनिल कपूर, तू लवकरच बॉलिवूडमध्ये असशील, मला खरंच वाटलं अनिल कपूर आहे’, अशा प्रकारच्या अनेक कमेंट या व्हायरल पोस्टवर येत आहे.

जॉनने पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. नेटकऱ्यांनी जॉनच्या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, ‘तुला खिलाडी बनाव लागेल आणि वन टू का फोर, फोर टू का वन, शिकावे लागेल.’ दुसऱ्याने म्हटलंय, ‘मला खरंच वाटलं, तू अनिल कपूर आहेस.’ एका युजरने तर त्याने लिहलंय, ‘भाई तुझ्या शरीरावर केस कमी आहेत, नॉट व्हॅलिड’ अतिशय भन्नाट कमेंट केली आहे.

सिद्धार्थ आनंदच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामध्ये अनिल कपूर दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासह दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन आहेत. रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्येही ते दिसतील. तसेच, ते ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलचाही एक भाग आहेत. त्याचबरोबर ब्रिटिश थ्रिलर सीरिजच्या हिंदी रिमेकमध्ये ते आदित्य रॉय कपूर आणि शोबित धूलिपालासह दिसतील.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंतप्रधानांनी देशात आणले चित्ते; सोशल मीडियावर मिम्सचा महापूर, पाहून तुम्हालाही येईल हसू

परी म्हणू की सुंदरा! जान्हवीच्या फोटोंची बातचं न्यारी
‘जगात सर्वकाही ठीक चाललेलं नाही…’, संयुक्त राष्ट्र सभेत प्रियांका चोप्राचे वक्तव्य, भारताबद्दल केले मोठे विधान

हे देखील वाचा