Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड आजोबांसारखं अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचं होतं रणबीर कपूरला; मात्र या कारणामुळे स्वप्न अजूनही अधुरं राहिलं…

आजोबांसारखं अभिनेता आणि दिग्दर्शक व्हायचं होतं रणबीर कपूरला; मात्र या कारणामुळे स्वप्न अजूनही अधुरं राहिलं…

यंदाच्या इफ्फी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणबीर कपूरने राहुल रवेल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या चित्रपटांबद्दल चर्चा केली. यादरम्यान त्याने सांगितले की त्याचे वडील ऋषी कपूर आणि आजोबा राज कपूर यांच्याप्रमाणेच त्याला अभिनेता आणि दिग्दर्शक बनायचे होते.

यावेळी राहुल रवैलने रणबीर कपूरला विचारले की, वडील ऋषी कपूर आणि आजोबा राज कपूर यांचा वारसा पुढे नेत अभिनेता होण्यासोबतच मला दिग्दर्शक व्हायला आवडेल. याला उत्तर देताना रणबीर कपूरने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.रणबीर कपूरने सांगितले की, राज कपूर यांनी वयाच्या 24 व्या वर्षी आग हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. ते त्यांच्या कामात अतिशय निष्णात होते. दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, लेखन आणि संपादनातही त्यांनी नशीब आजमावले आहे.

रणबीर कपूरने सांगितले की, त्याने जग्गा जासूसची निर्मिती केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता मी माझे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. माझे वडील प्रत्येक वेळी विचारायचे की मी कोणत्या चित्रपटात काम करत आहे.

रणबीर कपूरने सांगितले की, त्याला त्याचे वडील आणि आजोबांसारखे दिग्दर्शन करायचे आहे. तथापि, तो आता 42 वर्षांचा आहे आणि त्याच्या आजोबांनी वयाच्या 24 व्या वर्षी त्याचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. रणबीरने सांगितले की, मी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शन कठीण आहे हे मला माहीत आहे. रणबीर कपूर म्हणाला की, अभिनय करणंही अवघड आहे पण दिग्दर्शन करणं जास्त कठीण आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीने दिले उत्तर; म्हणाली, ‘पैसा सत्य लपवू शकत नाही’

हे देखील वाचा