अनिता हसनंदानीने मुलासोबतचा व्हिडिओ शेअर करून, व्यक्त केला मातृत्वाचा अनुभव; खास व्हिडिओला चाहत्यांची पसंती


टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागीण’ आणि ‘ये हैं मोहबते’ फेम अनिता हसनंदानी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून खूप चर्चेत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. अनिता हसनंदानी ही सध्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला आहे. तिने तिच्या मुलाचे नाव आरव असे ठेवले आहे. ती नेहमीच तिच्या मुलासोबत क्यूट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये अनिता तिच्या मुलाबाबत असलेली तिची आपुलकी आणि त्याच्यासोबत ती कसा वेळ घालवते हे सांगत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “आई झाल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की, आरवसाठी मी जे काही करते ती माझी जबाबदारी नाहीये. मी त्याला बाहेर घेऊन जाते,‌‌ खेळवते ही तर माझ्यासाठी त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची एक संधी आहे. या प्रवासात मिमी (बेबी प्रॉडक्ट) मला हे सगळं करण्यास मदत करतात. मला प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवायचा आहे, कारण तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण मुलं इतक्या लवकर मोठी होतात की, आपल्याला समजत देखील नाही. मी त्याच्याशी बोलण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे आहे की, तो पहिला शब्द मम्मी म्हणेल. त्यामुळे सगळ्या पालकांना मी एवढेच सांगेल, जेवढा जमेल तेवढा जास्त वेळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत घालावा कारण ही वेळ परत येत नाही.” (Anita hasanandani share a video with her son, share her parenting experience)

अनिता हसनंदानीने छोट्या पडद्यावर अनेक मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने एकता कपूरच्या ‘नागीण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. पण नुकतेच काही दिवसापूर्वी तिने सांगितले की, ती आता इंडस्ट्री सोडून बाळाकडे पूर्ण लक्ष देणार आहे. त्यामुळे तिचे चाहते काहीशा प्रमाणात नाराज देखील झाले होते. परंतु तिला जमेल तेव्हा ती नक्कीच परत येणार आहे, असे देखील तिने सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.