टिव्हीवरील ‘पवित्र रिश्ता‘ ही मालिका प्रत्येक घराघरात बघितली जात होती. या मालिकेती अर्चना आणि मानवची जोडी प्रचंड प्रसिद्ध झाली. या मालिकेती अर्चनाची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने साकारली आहे. तर मानवची भूमिका सर्वांचा लाडका कलाकार सुशांत सिंग राजपूतने साकारली होता. सुशांत आज आपल्यात नाही. पण त्याचे चाहते त्याला आजही विसरलेले नाहीत. अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अंकिताला या मालिकेतून खूप यश मिळाले होते. ‘पवित्र रिश्ता’ची अर्चना म्हणून ती घराघरात प्रसिद्ध झाली.
अंकिताने (Ankita Lokhande) ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘झलक दिखला जा 4’सह अनेक शाेमध्ये काम केले आहे. ‘पवित्र रिश्ता’मध्ये मुख्य भूमिका साकारून वर्षानुवर्षे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे. अंकिता हिने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ती ‘बागी 3’ चित्रपटात दिसली होती. मात्र, दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री सहाय्यक भूमिकेत दिसली. नुकताच अंकिताने पवित्र रिश्ताबद्दल एक नवा खुलासा केले आहे.
माध्यमांशी बोलताना अंकिता म्हणाली की, ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर मी जेवढे काम केले आहे, तेवढे काम मी आयुष्यात कधीही केले नाही. मला आठवते की, मी तीन महिने घरी गेले नव्हेत. सेटवर रात्रंदिवस शूटिंग करत होते. हे खरं आहे की, सेटवर रूम आणि वॉशरूम मला देण्यात आले होते. मी तिथे आंघोळ करून माझ्या शूटिंगसाठी तयार होत असायचे. त्यावेळी माझ्याकडे केशभूषा होती, अस्मिता मला कपडे इस्त्री करायला मदत करायची. त्यावेळी मी 148 तास सतत शूट केले होते.
अंकिताने पुढे सांगितले की, “मला ‘पवित्र रिश्ता’च्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी ऑडिशनला गेली होती. मला या भूमिकेबद्दल काहीच माहिती नव्हती. मला एवढंच माहीत होतं की, ती एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे. मला आठवतं की माझे आजोबा नेहमी टिकली लावा म्हणायचे, आमच्या मराठी संस्कृतीमुळे आणि त्यांच्या काळात मुली दहावीपासून साडी आणि टिकली लावतात. त्यामुळे मी फक्त हे लक्षात ठेवले आणि ऑडिशनसाठी एक काळा ठिपका लावला. ऑडिशन तितकीशी चांगली झाली नाही. पण मी सिलेक्ट झाले. ” (Ankita Lokhande told that story on the sets of Pavitra Rishta)
अधिक वाचा-
–साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल
–रूबीना दिलैकने शेअर केले तिचे स्विमसूटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, पाहा जबराट लूक