संपुर्ण यादी: पिफ २०२१मध्ये दाखविण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी, ‘पोरगा मजेतंय’सोबत पाहायला मिळणार हे १२ चित्रपट


 

पुणे | पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणा-या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांच्या नावांबरोबरच यावर्षी स्पर्धात्मक विभागाचे परीक्षण करणा-या ज्युरींची नावे, मराठी सिनेमा टूडे विभागातील चित्रपट आणि महोत्सवाची ओपनिंग फिल्म देखील जाहीर केली. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, महोत्सवाचे कलात्मक प्रमुख व चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनचे संचालक अमित त्यागी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जागतिक स्पर्धा अर्थात वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागात १४ तर मराठी स्पर्धा विभागात ७ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवादरम्यान ज्युरी हा एक महत्त्वाचा विषय असतो. यावर्षी चित्रपट विषयातील तज्ज्ञ असलेले आठ आंतरराष्ट्रीय ज्युरी हे महोत्सवाचे परीक्षण करतील, याचा आम्हाला आनंद आहे. याबरोबरच मंगोलियाचा ‘द वुमन’ हा ओटगन्झोर बॅच्गुलुन दिग्दर्शित चित्रपट ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून महोत्सवाच्या सुरुवातीला दाखविण्यात येणार आहे.”

महोत्सवा दरम्यान दरवर्षी होणारी स्टुडंट कॉम्पिटीशन यावर्षी होणार नाही. मात्र असे असले तरी  देशाबरोबरच परदेशातील एकूण ६ चित्रपट संस्थांकडून प्रत्येकी २ अशा पद्धतीने आम्ही चित्रपट मागाविले आहेत. महोत्सवा दरम्यान हे चित्रपट दाखविण्यात येतील, अशी माहिती अमित त्यागी यांनी दिली.

महोत्सवाचे उप संचालक विशाल शिंदे म्हणाले, “यावर्षीचा महोत्सव हा ऑनलाईन पद्धतीने देखील होणार असून त्यासाठी आवश्यक सर्व काळजी आम्ही घेत आहोत. मुख्य म्हणजे ऑनलाईन पद्धतीने चित्रपट दाखविताना त्याची पायरसी होण्याची शक्यता असते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कान, बर्लिन, व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय महोत्सवात वापरण्यात आलेल्या ‘शिफ्ट ७२’ या ऑनलाईन प्लॅफॉर्मचा आम्ही वापर करीत आहोत, जेणेकरून पूर्ण सुरक्षितता पाळली जाऊन चित्रपट रसिकांनाही त्याचा आस्वाद घेता येईल. अशा पद्धतीच्या व्यासपीठाचा वापर करणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव महोत्सव ठरला असल्याचा देखील आम्हाला आनंद आहे. शिवाय ऑनलाईन नोंदणी केलेल्या रसिकांना येणारी लिंक देखील सुरक्षित असणार असून एका डिव्हाईस वरून केवळ एका वेळेसच लॉग इन करता येणे शक्य आहे. त्यानंतर रसिकांना त्या दिवसाचे चित्रपट पुढील २४ तासात कधीही पाहता येणे शक्य होणार आहे. शिवाय चित्रपट गृहात देखील शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन होईल याची खबरदारी घेण्यात येणार आहे.”

जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे-
१.  शुड द विंड ड्रॉप (दिग्दर्शक – नोरा मार्टिरोस्यान, फ्रान्स, अर्मेनिया, बेल्जियम)
२. इन द शॅडोज (दिग्दर्शक – अर्देम म टेपेगोज, टर्की)
३. अप्परकेस प्रिंट (दिग्दर्शक- राडू जुड, रोमानिया)
४. ए कॉमन क्राईम (दिग्दर्शक- फ्रान्सिस्को मार्केज, अर्जेंटिना/ ब्राझिल/ स्वित्झर्लंड/ यु.के)
५. द एलियन (दिग्दर्शक- नादर साइवर, इराण)
६. काला अझार (दिग्दर्शक – यानिस रफा, नेदरलँड्स / ग्रीस)
७. ट्रू मदर्स (दिग्दर्शक – नाओमी कवासे, जपान)
८. नाईट ऑफ द किंग्ज – (दिग्दर्शक – फिलीप लाकोत, फ्रान्स, कॅनडा, सेनेगल)
९. रशियन डेथ (दिग्दर्शक – व्लादिमीर मिरझोएव्ह, रशिया)
१० डिअर कॉमरेड्स (दिग्दर्शक – आंद्रेई कोंचालोव्स्की, रशिया)
११. शार्लटन (दिग्दर्शक – आन्येश्का हॉलंड, चेक/ पोलंड)
१२. द बेस्ट फॅमिलिज् – (दिग्दर्शक- हाविएर फ्युएन्तेस – लिऑन, कोलंबो- पेरू)
१३.  आयझॅक – (दिग्दर्शक – युर्गीस मॅटुलेव्हिशीयस, लिथुएनिया)
१४.  १२ बाय १२ – (दिग्दर्शक – गौरव मदान, भारत)

मराठी स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे –
१.     पोरगा मजेतंय (दिग्दर्शक – मकरंद माने)
२.   फिरस्त्या (दिग्दर्शक- विठ्ठल मच्छिंद्र भोसले)
३.    फन’रल (दिग्दर्शक – विवेक दुबे)
४.    जून (दिग्दर्शक – वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले)
५.    गोदाकाठ (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे)
६.    काळोखाच्या पारंब्या (दिग्दर्शक – मकरंद अनासपुरे)
७.    टक-टक (दिग्दर्शक – विशाल कुदळे)

महोत्सवाच्या ज्युरींची नावे पुढीलप्रमाणे –
१.     गियॉर्जी बॅरन (हंगेरी- चित्रपट समीक्षक)
२.    मनिया अकबारी (इराण, कलाकार व चित्रपट निर्माते)
३.     लिसा रे (कॅनडा, अभिनेत्री)
४.     लुआँग डिंग डांग (व्हिएतनाम, दिग्दर्शक, लेखक व चित्रपट निर्माते)
५.    आंद्रे कोसॅक (स्लोव्हीया, चित्रपट निर्माते)
६.     गोरान राडोव्हानोविच (सर्बिया, लेखक व चित्रपट निर्माते)
७.     ए श्रीकर प्रसाद (भारत, प्रख्यात चित्रपट संपादक)
८.    सुमन मुखोपाध्याय (भारत, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते)

स्पर्धे व्यतिरिक्त प्रीमिअर होणारे ‘मराठी सिनेमा टूडे’ विभागातील चित्रपट –
१.     गोत (दिग्दर्शक – शैलेंद्र कृष्णा)
२.     ताठ कणा (दिग्दर्शक – गिरीश मोहिते)
३.     कंदील (दिग्दर्शक – महेश कंद)
४.     मे फ्लाय (दिग्दर्शक – किरण निर्मल)
५.     जीवनाचा गोंधळ (दिग्दर्शक – प्रशांत दत्तात्रय पांडेकर)


Leave A Reply

Your email address will not be published.