Tuesday, February 4, 2025
Home बॉलीवूड मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आहे. यावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यावर अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि रिचा चड्डा यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला आहे. आता प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे.

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले की, “मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत राक्षसी वृत्तीची घटना लज्जास्पद आहे. माझ्या मनात खूप संताप होत आहे. मी राज्य सरका आणि केंद्र सरकारला विनंती करतो की, या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. अशी शिक्षा द्या ज्याचा ते भविष्यात विचार करून थरथर कापतील.”

अनुपम खेर यांच्या पोस्टवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, “मध्यपूर्वमधील शिक्षा भारतातही व्हायला हवी. त्याला थेट फासावर लटकवण्याची हिंमत कोणी करणार नाही.” त्याचवेळी एकाने अनुपम खेर यांनाही टोमणा मारला आहे. त्यांने लिहिले की, “तुम्हीही बराच दिवस झाले झोपला आहात.आज बरी तुम्हाला मणिपूरची आठवण आली आहे. तुम्हा लोकांना तर एक संधी मिळाली चित्रपट बनवण्यासाठी.” अशा विविध कमेंट त्यांच्या पोस्टवर येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

यादरम्यान, ही घटना 4 मेला घडली आहे. त्या महिलांना नग्न आवस्थेत फिरण्यास भाग पाडण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर जया बच्चन यांनीही संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मला इतके वाईट वाटले की, मी संपूर्ण व्हिडिओ पाहू शकलो नाही. महिलांची काळजी कोणीच घेत नाही. महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. हे खूप निराशाजनक आहे. महिलांसोबत रोज काही ना काही घडत असते. हे अत्यंत दुःखद आहे.” (Anupam Kher expressed anger over ‘that’ incident in Manipur)

अधिक वाचा- 
आमचे ठरले! स्वानंदी टिकेकरने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो केला शेअर, नाव ऐकून नक्कीच बसेल आश्चर्याचा धक्का
ओळखलंत का हिला? अभिनेत्रीचा अतरंगी लूकवर व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा