मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. आजच्या पिढीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वानंदीकडे पाहिले जाते. दिग्गज अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक म्हणून या इंडस्ट्रीमध्ये स्वानंदी आली हे जरी खरे असले तरी तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वानंदीने तिच्या करियरमध्ये अनेक आणि विविध प्रकारच्या उत्तम भूमिका साकारल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र आता अचानक स्वानंदी लाइमलाईट्मधे येण्याचे कारण म्हणजे तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल कबुली दिली आहे. सोशल मीडियावर तिने तिचा आणि त्या खास व्यक्तीचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
View this post on Instagram
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअऱ केली आहे. यात ती गायक आशिष कुलकर्णीबरोबर दिसत आहे. आशिषबरोबरचा फोटो शेअर करत स्वानंदीने आमचं ठरलं आणि लव्ह असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. मुख्य म्हणजे आशिषला आपण सर्वांनी इंडियन आयडॉल १२ मध्ये पाहिले आहे.
दरम्यान स्वानंदीबद्दल बोलायचे झाले तर ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये मीनल ही भूमिका साकारून नावारूपास आली. पुढे तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’ मालिकेत काम केले. स्वानंदीने ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी गायनाच्या शोचे विजेतेपद देखील जिंकले आहे. सोबतच तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.
तर आशिष कुलकर्णी एक गायक आणि गीतकार आहे. त्याने २००८ मध्ये, झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभाग घेतला होता. २०१५ मध्ये त्याने मित्रांसोबत ‘रॅगलॉजिक’ हा संगीत बँड तयार केला. आशिषने हार्ड रॉक कॅफे, हाय स्पिरिट्स, ब्लूफ्रॉग यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर त्याने काम केले आहे.