अनुपम खेर यांनी शेअर केला त्यांच्या टफ वर्कआऊटचा व्हिडिओ; फिटनेस बघाल तर व्हाल हैराण


सिनेसृष्टीमध्ये कलाकरांना त्यांच्या फिटनेसची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. कलाकार आणि त्यांच्या फिटनेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तरुणाईपासून जुन्या दिग्गज कलाकारापर्यंत सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देताना दिसतात. अनेक कलाकारांचे व्यायाम करतानाचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कलाकार आणि त्यांचे फिटनेसचे वेड पाहून सामान्य लोकही फिटनेस गांभीर्याने घेत असल्याचे आपल्याला दिसून येते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अनुपम खेर. अनुपम खेर हे त्यांच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांचे नाव नेहमी दिग्गज कलाकारांच्या यादीत घेतले जाते. याच अनुपम खेर यांनी त्यांचा जिममध्ये व्यायाम करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते अतिशय टफ वर्कआऊट करताना दिसत आहे. (anupam kher shares fitness video)

त्यांचा हा ५८ सेकंदाचा हा ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ पाहून भल्याभल्याना नक्कीच घाम फुटेल.  हा व्हिडिओ पोस्ट करताना अनुपम खेर यांनी लिहिले, “लेडीज अँड जेंटलमन, हा माझा आतापर्यंतचा सर्वात छोटा सिनेमा आहे. #TheMustache. फक्त ५८ सेकंदाचा हा व्हिडिओ खूप काही बोलून जातो. नक्की बघा आणि शेअर देखील करा. हा छोटा सिनेमा जिनियस #चार्ली चॅप्लिन यांना माझ्याकडून श्रद्धांजली आहे. आशा करतो तुम्हाला हे आवडेल.” या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला चार्ली चॅप्लिनचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीत देखील वाजत आहे.

सध्या सोशल मीडियावर अनुपम यांचा हा व्हिडिओ तुफान गाजत असून, फॅन्स आणि कलाकार देखील यावर एक से बढकर एक कमेंट करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय अभिनेते म्हणून देखील अनुपम खेर ओळखले जातात. अनुपम खेर नेहमी त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ, फोटो शेअर करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.