हर्ष गुजराल हा एक लोकप्रिय कॉमेडियन आहे. त्याने ‘खतरों के खिलाडी 15’ मधुन थरारक स्टंटच्या दुनियेत भाग घेतला आहे. यापुर्वी तो द ट्रेटर्सच्या पहिल्या सीझनमध्ये दिसला होता. आपल्या विनोदीबुध्दी आणि काॅमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवण्यासाठी तो ओळखला जातो. तर केप टाऊनमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच शो बाबक तो बोलताना म्हणाला की, स्वत: आव्हन देणारे टास्क आणि आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची संधी त्याला या शो मध्ये मिळाली असे त्याने म्हणले आहे. आणि त्यामुळे त्याने या शोला हो असे म्हणले.
त्याने आपल्या खऱ्या आयुष्यातील एका भीतीबाबत सांगितले जी प्रेक्षकांना शोमध्ये दिसेल अशी त्याला चिंता होती, हर्ष म्हणाला मला वाटते की, भीतीवर मात करणे खुप गरजेचे आहे. पण मी केप टाकुनही आणखी भीती परत आली, मला खोल पाण्याची खुप भीती वाटते. मला पाण्यामध्ये नेहमीच भीती वाटते. आणि मला माहित होते की, ते माझी परीक्षा घेतील पण खरे सांगायचे झाले तर माझी सर्वात मोठी भीती केवळ स्टंटची नव्हती, तर सर्वांसमोर अपयशी होण्याची होती. लोकांना माझ्यावर हसण्याची सवय आहे. पण माझ्या स्टंटची कोणासमोर चेष्टा होवु नये असे मला वाटायचे. त्यामुळे मी मानसिक आणि शारीरिक, दोन्ही प्रकारे शक्य तितकी तयारी केली. पण खरे आणि अनोखे आव्हान तुम्हाल तिथे येते.
‘खतरों के खिलाडी’ शोबद्दल बोलताना हर्ष (harsh)म्हणाला, “स्टँड-अप कॉमेडी हे नेहमीच माझे कम्फर्ट झोन राहिले आहे, कारण मी तिथे वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे, मला असे काहीतरी वेगळे करायचे होते जिथे मला आव्हान मिळाले.
हेही वाचा
‘महाभारत’ फेम या अभिनेत्याला आवडला नाही ‘रामायण’चा ट्रेलर; म्हणाल, ‘मी प्रभावित झालो नाही’










