Latest Posts

कॅन्सरशी लढा देणाऱ्या किरण खेर यांच्या वाढदिवसानिमित्त, पती अनुपम खेर यांची खास पोस्ट व्हायरल


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे  अभिनयासोबतच राजकारणात देखील सक्रिय झाले. अगदी राजेश खन्ना पासून ते सुनील दत्त, गोविंदा, नगमा आदी अनेक कलाकारांनी राजकारणात त्यांची सेकंड इंनिंग चालू केली. काहींना यश मिळाले तर काहींना अपयश. खूप पूर्वीपासूनच बॉलिवूड आणि राजकारण यांचे जवळचे नाते आहे. आजच्या काळात देखील अनेक अभिनेते, अभिनेत्री अभिनय आणि राजकारण हे दोन्ही क्षेत्र गाजवताना दिसतात. अशाच एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे किरण खेर होय.

आज किरण खेर त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी किरण यांना शुभेच्छा देताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अनुपम यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो पोस्ट करत लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय किरण. देव तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, देव तुम्हाला जगातले सर्व आनंद देवो. संपूर्ण जगातले लोकं तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही प्रामाणिक, निष्पक्ष आणि स्पष्टवक्ता आहात. तुम्ही जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना धीराने आणि संयमाने करता. तुम्ही नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. तुम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद.” (anupam kher write a special note for wife kirron kher birthday)

अनुपम यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली असून, फॅन्स देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. किरण खेर मागील काही काळापासून ब्लड कॅन्सरसोबत लढत आहेत. त्यांना कॅन्सर झाल्याचे समजताच इंडस्ट्रीसोबतच त्यांच्या फॅन्सने देखील त्यांनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केल्या. काही दिवसांपूर्वीच किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत, किरण खेर या आता ठीक आहे अशी माहिती दिली होती.

किरण खेर यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात पंजाबी चित्रपटांमधून केली. त्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये त्यांचा मोर्चा वळवला. किरण यांनी हिंदीमध्ये ‘वीर-जारा’, ‘दोस्ताना’, ‘ओम शांती ओम’, ‘फना’, ‘देवदास’, ‘सिंग इज किंग’, ‘मैं हूं ना’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सोबतच किरण खेर यांनी टीव्हीवर देखील अनेक रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून भूमिका साकारली. किरण यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss