‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन


दैनंदिन जीवन रंजक बनवण्यासाठी टीव्ही मालिका हे एक उत्तम साधन आहे. उत्तम स्टोरी व योग्य सादरीकरण असेल, तर ती मालिका हिट झालीच म्हणून समजायचं. अशीच एक मालिका सध्या टीव्हीच्या जगात धुमाकूळ घालतेय, ती आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेतील ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना विशेष भावली. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिचा एक फोटो व्हायरल होत आहे, त्यासोबत तिने स्त्रियांना एक खास संदेश दिला आहे.

अन्विताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अन्विता साडीमध्ये दिसली आहे. तिने यात काळ्या रंगाची साडी परिधान करून, केस मोकळी सोडली आहेत. शिवाय नाकातील नथ आणि चेहऱ्यावरचा कमीत कमी मेकअप तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. अगदी क्यूट स्माईल देत, स्वीटूने स्वतः हा सेल्फी क्लिक केला आहे.

हा फोटो शेअर करत अन्विता कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर स्वतः लाच एका साडीमध्ये गुंडाळून त्याच्याशी स्टाईलमध्ये लढा!” सोबतच तिने ‘सारीनॉटसॉरी’ हे हॅशटॅगही दिला आहे. स्वीटूच्या प्रेरणादायी कॅप्शनने अनेकांना प्रभावित केले आहे. या सुंदर फोटोवर आता चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.