लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील इतर कलाकारां‌प्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. वेगवेगळी पात्रं निभावून बॉलिवूडमध्ये स्वता: ची एक वेगळीच छाप पाडणारे अमिताभ बच्चन, यांना चित्रपट सृष्टीत प्रवेश करून आता 52 वर्ष पूर्ण झाले आहेत. यशस्वी 52 वर्षानंतरही चित्रपट सृष्टीत त्यांची कारकीर्द चालूच आहे. याचा पुरावा म्हणजे अमिताभ बच्चन यांची सोशल मीडिया वरील पोस्ट.

काही तासांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, अमिताभ बच्चन एका गाडीच्या आत मास्क लावून बसलेले दिसत आहेत. चेहऱ्यावर मास्क लावून ते त्यांच्या चाहत्यांना हे सांगत आहेत की, दुसऱ्या लॉकडाऊन नंतर ते पहिल्यांदा शूटिंगसाठी बाहेर निघाले आहेत. या वयातही ते त्यांच्या कामाबाबत खूप सिरियस आहेत. कामाच्या बाबतीत ते आजही मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देतात.

अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर करून एक कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “सकाळी ७ वाजता कामावर जात आहे. दुसऱ्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदा शूटिंग साठी बाहेर जात आहे. ते पण पैंगोलीन मास्कसोबत. प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट अजूनच सुंदर होत जाणार आहे.” (Amitabh Bachchan going to first time on shooting after second lock down)

याआधी देखील त्यांनी सोशल मीडियावर एक थ्रो बॅक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते एका लहान मुलीला ऑटोग्राफ देताना दिसत होते. त्यावेळी त्या मुलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. त्यांच्या सोबत शशी कपूर देखील दिसत होते. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले होते की, “ते देखील किती छान दिवस होते जेव्हा चाहते अशा पद्धतीने प्रेम दाखवत होते. जसे या लहान मुलीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा. पण आता केवळ ईमोजीचा वापर होतो.”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 52 वर्षाच्या कारकिर्दीत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘शोले’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सूर्यवंशम’, ‘मर्द’, ‘दिवार’, ‘मोहब्बतें’ यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन

-‘सनीचा हॉट आणि शानदार शॉट!’ अभिनेत्रीने केला ग्लॅमरस फोटो शेअर; मिळाले १४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स


Leave A Reply

Your email address will not be published.