‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता


साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते.

अलीकडेच मृण्मयीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात हरवलेली दिसत आहे. हे फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने एकूण ३ फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची निरागस सुंदरता पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृण्मयी एका ठिकाणी बसली आहे आणि तिच्या आजूबाजूला निसर्गाचं हिरवंगार सौंदर्य दिसत आहे. (see the natural beauty of mrunmayee deshpande while she is lost in nature’s beauty)

हे फोटो शेअर करत, तिने याला साजेसं असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. एका फोटोखाली मृण्मयीने लिहिले, “तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू बहराच्या, बाहूंची.” तर दुसऱ्या फोटोखाली ती म्हणतेय की, “तू ऐलराधा, तू पैल संध्या चाफेकळी प्रेमाची…” यासोबत तिने हे फोटो मेकअप विना असल्याचेही सांगितले आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. लाईक आणि कमेंट करून नेटकरी यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय अभिनेता सुव्रत जोशीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. कमेंटमध्ये सुव्रत गंमत करत म्हणाला, “खारीच्या गं डोळ्यांची.”

कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. आता ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ हा गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.