Monday, October 27, 2025
Home मराठी अखेर ‘बॅन लिपस्टिक’ प्रकरणाचा झाला उलगडा, ‘अनुराधा’ वेबसिरीजचा टिझर आला समोर

अखेर ‘बॅन लिपस्टिक’ प्रकरणाचा झाला उलगडा, ‘अनुराधा’ वेबसिरीजचा टिझर आला समोर

मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींनी ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे, म्हणत सोशल मीडियावर लिपस्टिक पुसताना व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे सगळ्यांमध्ये ही चर्चा रंगली होती की, नक्की प्रकरण काय आहे? त्यांचा हा व्हिडिओ पाहूनच प्रेक्षकांना अंदाज आला होता की, हे कोणत्यातरी चित्रपटाचे प्रमोशन असणार आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ (Anuradha) नावाची वेबसिरीज येणार आहे. ही वेबसिरीज पूर्ण ७ भागांची असणार आहे. यानिमित्त प्रमोशन करताना हे व्हिडिओ शेअर केले होते. ही वेबसिरीज प्लँनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या वेबसीरिजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला आहे. या टीझरमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज दिसत आहे. तसेच बाकी अनेक व्यक्तिरेखा दिसत आहेत. आता या बॅन लिपस्टिकचे प्रकरण काय आहे हे आता वेबसिरीजमधून समोर येणार आहे.  (anuradha series teaser released starring actress tejaswini pandit in main lead)

‘अनुराधा’ वेबसिरीजमधून संजय जाधव वेबसीरिजच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांनी संगीत दिले आहे.

याबाबत दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणतात की, “आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की. माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल.’’ या वेबसिरीजचा टिझर पाहून आता प्रेक्षकांना ही वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा