‘दुनियादारी’ची आठ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने पोस्ट शेअर करत जागवल्या चित्रपटाच्या गोड आठवणी


मनोरंजनविश्वात अनेक सिनेमे तयार होतात. यातले काही हिट होतात, तर काही फ्लॉप आणि काही सिनेमे हिट होण्यासोबतच बॉक्स ऑफिस आणि लोकांच्या प्रेमाची समीकरणंच बदलतात. हे चित्रपट कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनावर त्यांचे नाव कोरतात. खूप काळानंतर असे मनावर राज्य करणारे सिनेमे तयार होतात. मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांना सोनेरी दिवस आले आहे. कथा, अभिनय, गाणी, संगीत, दिग्दर्शन आदी सर्वच बाबतीत उजवे ठरणाऱ्या मोजक्याच चित्रपटांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘दुनियादारी.’

‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसची सर्व गणितच बदलली. १९ जुलै, २०१३ साली हा सिनेमा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे प्रदर्शित झाला आणि बघता बघता चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लची पाटी झळकली. फक्त महाराष्ट्रात नाही, तर महाराष्ट्राबाहेरही या सिनेमाने तुफान यश मिळवले. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आठ वर्ष पूर्ण झाले.

याच निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दुनियादारी चित्रपटाचे पोस्टर आणि ‘जिंदगी जिंदगी’ हे गाणे शेअर केले आहे. हे पोस्ट करताना त्याने लिहिले, “आठ वर्ष मैत्रीची, आठ वर्ष प्रेमाची.”

या मल्टीस्टारर सिनेमाने मैत्री आणि प्रेम याची नवीन व्याख्या सर्वांना शिकवली. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार आणि योगेश शिरसाठ आदी बऱ्याच कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात मैत्री पलीकडची मैत्री तर दाखवलीच, सोबतच कॉलेजमधील भन्नाट जीवन सुद्धा या चित्रपटाचे मुख्य आकर्षण होते. शिवाय या सिनेमातील गाणी देखील तुफान गाजली, किंबहुना आज इतक्या वर्षांनी देखील ती गाणी तितक्याच जोशाने आणि आवडीने ऐकली जातात.

प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाने मराठीमधील ऑल टाईम ब्लॉकबस्टर सिनेमाचे रेकॉर्ड देखील नावावर केले आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास १०० दिवस हा सिनेमा चालला. ५ कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जवळपास ३० कोटींचा व्यवसाय केला होता. जी मराठीमध्ये एक रेकॉर्डब्रेक कमाई ठरली. स्वप्निलच्या या पोस्टवर फॅन्ससोबतच कलाकारांनी देखील कमेंट्स करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.