अनुराग डोभाल हा एक युट्यूबर आहे. तसेच बिग बॉस 17 मध्येही दिसला होता. अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला. युट्यूबरने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण होताच अजून एक व्हिडिओ सात मार्च रोजी आला तो म्हणजे अनुराग डोभाल याच्या अपघाताचा तो व्हिडिओ होता. गाडी अत्यंत वेगाने चालवल्याने हा अपघात झाला. तर तो नंतर रुग्णालयात दाखल झाला त्यावेळेस त्याच्या युट्युबर मित्रांनी अनेक व्हिडिओ रुग्णालयातले शेअर केले होते. तर आता त्याला आयसीयूमधून सोडले आहे.
सोमवारी, अनुरागला (Anurag)आयसीयूमधून जनरल हॉस्पिटल रूममध्ये हलवण्यात आले. भीषण कार अपघातानंतर त्याच्या उजव्या कंबरेवर ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाने आता पुष्टी केली आहे की डोभालची प्रकृती स्थिर आहे आणि तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या पुनर्प्राप्ती कालावधीत त्यांची पत्नी रितिका चौहानच त्यांना भेटू शकतात.
शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातात डोभाल यांची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली, उलटली आणि नंतर विरुद्ध लेनमध्ये कोसळली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अपघात वेगामुळे झाला आहे की युट्यूबर जाणूनबुजून दुभाजकाला धडकला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार, अपघाताच्या वेळी कार ताशी 150 किमी वेगाने जात होती तर नंतर युट्यूबर अचानक वळला, ज्यामुळे गाडी दुभाजकाला धडकली.
पोलीस जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची,व अनुराग डोभाल गाडी चालवत असताना दाखवलेल्या लाईव्हस्ट्रीम फुटेजची देखील तपासणी करत आहेत. लाईव्हस्ट्रीम दरम्यान अनुराग कश्यपसोबत इंस्टाग्रामवर अनेक चाहते सामील झाले होते. ते असेही म्हणत होते की ही त्यांची शेवटची ट्रिप आहे. हे ऐकल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मला माहित नव्हते की अॅव्होकॅडो म्हणजे काय?’ अक्षय कुमारने सांगितला त्याचा आवडता पदार्थ


