पती विराटप्रमाणे आता अनुष्काही खेळणार क्रिकेट, टीम इंडियाच्या ‘या’ महिला खेळाडूच्या बायोपिकमध्ये साकारणार भूमिका


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या प्रेग्नंसीनंतर चित्रपटसृष्टीपासून लांब झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर ती तिचा संपूर्ण वेळ तिच्या मुलीला देत आहे आणि तिचे आईपण एन्जॉय करत आहे. मात्र, तसे तिने या दरम्यान वेबसीरिज ‘पाताललोक’ आणि ‘बुलबुल’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामुळे प्रेक्षकांनी तिचे खूप कौतुक केले आहे. आता लवकरच ती मोठ्या पडद्यावर येणार आहे.

अनुष्का शर्माने तिच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ती भारताची महिला क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. झूलन गोस्वामी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 333 विकेट घेणारी जगातील पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे. ती ‘चकदहा एक्स्प्रेस’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे.

अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होता. या फोटोमध्ये ती भारतीय क्रिकेट संघाच्या पोशाखात दिसत होती. हा फोटो कोलकातामधील ईडन गार्डनमधील होता.

माध्यमातील वृत्तानुसार, ती झूलन गोस्वामी हिच्या बायोपिकसाठी फोटोशूट करत होती. परंतु नंतर याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही.

बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, सूत्राने त्यांना अशी माहिती दिली आहे की, झूलन गोस्वामीच्या स्क्रिप्टवर अजून काम चालू आहे. या चित्रपटाची शूटिंग या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी सुरुवातीला चालू होऊ शकते.

झूलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 वर्षाचा प्रवास केला आहे.‌ तिने वनडे सामन्यांमध्ये 200 पेक्षाही जास्त विकेट घेतल्या आहेत. तिने आतापर्यंत 180 वनडे सामने खेळले आहेत आणि 236 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे 11 कसोटी सामन्यांमध्ये 41 विकेट्स आणि 62 ‌टी20 सामन्यांमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे अनुष्काचा पती विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो एक जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. आता अनुष्काही पतीप्रमाणेच क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.