गायनानंतर आता ‘स्वीटू’ची नृत्यकला पाहून प्रभावित झाले नेटकरी; व्हिडिओवर उमटतायेत प्रतिक्रिया


सध्या झी टीव्हीवर प्रसारित होणारी, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका टीव्ही जगात धुमाकूळ घालत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत, मात्र ‘ओम’ अन् ‘स्वीटू’च्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंतही केले जातात.

नुकतीच अन्विता गाणं गाताना दिसली होती. अरिजित सिंगने गायलेलं ‘आबाद बरबाद’ हे गाणं गाऊन तिने नेटकऱ्यांना प्रभावित केलं. गाणं गायल्यानंतर आता अभिनेत्री नाचतानाही दिसली आहे. अन्विताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ‘झोंका हवा का आज’ या गाण्यावर थिरकताना दिसली आहे.

या तिचे हावभाव आणि सर्वकाही अगदी पाहण्यासारखे आहेत. तिच्या डान्स स्टेप्स तर इतक्या परफेक्ट आहेत, की कोणीही तिच्याकडे बघतच राहील. यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हलक्या पण जबरदस्त स्टेप्सने डान्स करून, तिने अवघ्या सोशल मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधलेलं पाहायला मिळत आहे.

हा डान्स व्हिडिओ शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “झोंका हवा का आज भी.” सोबतच तिने तिच्या डान्स प्रशिक्षिकेला इथे टॅगही केलं आहे. प्रतिभावान स्वीटूची वेगवेगळी कौशल्ये पाहून, नेटकरी खूप प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.