Saturday, July 6, 2024

रवी किशनच्या अडचणीत वाढ, न्यायाच्या आशेने अपर्णा सोनीने घेतली हायकोर्टात धाव

अभिनेता आणि भाजपचे गोरखपूरचे खासदार रवी किशन (Ravi Kisan) सध्या चर्चेत आहेत. अपर्णा सोनी या 54 वर्षीय महिलेने खासदार रवी किशन हे आपल्या मुलीचे वडील असल्याचा आरोप केला आहे. अपर्णा सोनीच्या या आरोपानंतर अभिनेत्याची पत्नी प्रीती शुक्ला हिने लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये तीच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. न्यायासाठी अपर्णा यांनी गेल्या शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

प्रीती शुक्ला ही अभिनेता रवी किशनची पत्नी आहे. गेल्या शनिवारी त्यांनी लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात अपर्णा सोनी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. तिने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की अपर्णा उर्फ ​​अपर्णा सोनी यांनी तिचा पती रवी किशनवर बलात्काराचा खोटा आरोप केला आहे. एवढेच नाही तर रवी किशनला ब्लॅकमेल करण्यासाठी तिने 20 कोटी रुपये मागितले आहेत.

अभिनेता रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला हिने अपर्णा सोनी विरोधात एफआयआर दाखल केला आहे. आता अपर्णाने न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अपर्णा म्हणाली की, तिच्याविरुद्ध नोंदवलेली एफआयआर दुर्भावनापूर्ण आहे. हा कायद्यातील कलमांचा गैरवापर आहे. अपर्णा पुढे म्हणाली की, रवी किशन हे तिची मुलगी शिनोवाचे जैविक पिता आहेत आणि त्यांनी हा दावा सहज केला आहे. अपर्णा यांच्या मते, हा दावा कोणत्याही गुन्हेगारी श्रेणीत येत नाही.

अपर्णा सोनी म्हणतात, ‘मी रवी किशनकडून कोणत्याही प्रकारची खंडणी मागितलेली नाही. मला फक्त माझी मुलगी शिनोवा हिला न्याय मिळवून द्यायचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपर्णा सोनी यांना शांत करण्यासाठी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर सूडाच्या भावनेने प्रेरित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

…म्हणून भाऊ कदमने नाकारला हिंदी शो; म्हणाला, ‘इथे जेवढा मान मिळतो तेवढा तिकडे…’
अखेर रडत रडत आयुष शर्माने का मागितली सलमान खानची माफी?, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा