Thursday, April 18, 2024

‘महादेव का गोरखपूर’ चित्रपटाचा टिझर रिलीझ, रवी किशन एकावेळी साकारणार 2 भूमिका

अभिनेता आणि खासदार रवी किशन (Ravi kishan) यांच्या ‘महादेव का गोरखपूर’ या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी संध्याकाळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी यूट्यूब चॅनलवर लॉन्च केला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये रवी किशनचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, भोजपुरी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘महादेव का गोरखपूर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेता रवि किशनचे दोन लूक पाहायला मिळत आहेत. एका लूकमध्ये तो महादेवच्या उग्र रूपात तर दुसऱ्या लूकमध्ये तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर लक्षात येते की या चित्रपटात दोन कालखंडाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये 1727 सालच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला असून त्यात मुजफ्फर खानच्या हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

टीझरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या जगात फक्त दोनच गोष्टी शाश्वत आहेत, चांगले आणि वाईट, ज्या कधीही मरत नाहीत. त्यांचा पुनर्जन्म होत राहतो. शरीर, आत्मा आणि संपूर्ण जीवनाचे वर्णन महाकाल असे केले आहे. रविकिशनच्या एका पात्राचे वर्णन महादेवाचा भाग म्हणून केले आहे. टीझरमध्ये पुढे एक पोलीस अधिकारी म्हणतो, ‘यूपीमध्ये दोन आठवड्यांत मोठा हल्ला करण्याची योजना आखली जात आहे.’ नंतर रवी किशन पोलीस अधिकारी म्हणून प्रवेश करतो.

अभिनेता आणि खासदार रवी किशन हे स्वतः महादेवाचे भक्त आहेत. ते म्हणतात, “महादेव का गोरखपूर’ हा चित्रपट अप्रतिम बनला आहे. या चित्रपटात महादेव शिवजींची जी भव्यता आणि श्रद्धेने स्तुती करण्यात आली आहे. हे अकल्पनीय आहे, असे वर्णन यापूर्वी कोणत्याही चित्रपटात पाहिले गेले नाही. या चित्रपटासाठी महादेवजींनी माझी निवड केली हा माझ्यासाठी खूप मोठे सौभाग्य आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.”

‘महादेव का गोरखपूर’ या चित्रपटाची निर्मिती रवी किशन यांनी प्रितेश शाह आणि सलील शंकरन यांच्यासोबत केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मोहनन यांनी केले असून या चित्रपटाची कथा साई नारायण यांनी लिहिली आहे. रवी किशन म्हणाले, ‘या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग गोरखपूर आणि गोरखपूरच्या आसपास झाले आहे. अनेक स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘एका तुटलेल्या हार्टची’ कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अवधूत गुप्तेने केली ‘या’ म्युझिक अल्बमची घोषणा
सनी देओलच्या ‘सफर’ चित्रपटात दिसणार सलमान खानची झलक, करणार कॅमिओ रोल

हे देखील वाचा